Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेची पुण्यात धडाकेबाज कारवाई, स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायवर छापा

6

पुणे,दि.०८ : पुणे शहर आयुक्तालय हद्दीतील माजी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या बदली नंतर काही तासांतच पुण्यात अवैद्य धंद्यांचा सुसोळा पाहण्यास मिळत होता व पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा, काही दिवसांपासून कारवाईचा बडगा उगारलाचे चित्र पाहण्यास मिळल आहे व काल रात्री झालेल्या कारवाई लुलानगर कोंढवा, येथील लाना स्पर्श स्पा,सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय वर सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा,पोलिसांनी पर्दाफाश करत ४ पिडित महिलेची सुटका केली, तर स्पा मसाज सेंटर चालविणाऱ्या मालक व मॅनेजरला अटक केली. ही कारवाई शनिवार (दि.०७) सायंकाळी करण्यात आली. व स्पा मालक व मॅनेजर वर गुन्हा दाखल केली आहे. याबाबत विरूध्द कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुरनं २० / २०२३ भादवि ३७०,३४ सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. लुलानगर, कोंढवा पुणे रस्त्यावरील चौकातील एका इमारतीत लाना स्पर्श स्पा, नावाच्या मसाज सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा,पोलिसांना मिळाली.पोलिसांनी मिळालेल्या माहितीची खात्री करून स्पा सेंटरवर सायंकाळी सुमारास छापा टाकला.व याबाबत पोलीस कर्मचारी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपीन पीडित महिलेला पैशाचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होते.मिळालेल्या पैशातून आरोपी आपली उपजिविका भागवत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी स्पा सेंटरच्या मालकाला व मॅनेजर अटक करून आरोपी स्पा मालक व पिडीत महिलांना पुढील कारवाई करीता कोंढवा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर,संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, रामनाथ पोकळे,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, अमोल झेंडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच सपोनि अश्विनी पाटील, सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, आण्णा माने, प्रमोद मोहिते, पुष्पेंद्र चव्हाण, या पथकाने यशस्वी केली आहे.

सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेची पुण्यात धडाकेबाज कारवाई, स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायवर छापा

Leave A Reply

Your email address will not be published.