Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

50 लाखांच्या खंडणीसाठी पुण्यातून बिल्डरचे अपहरण,

13

पुणे,दि.१३:- मुंबईतील तीन बांधकाम व्यावसायिकांचे पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातून अपहरण केल्याची घटना गुरुवारी दि१२रोजी दुपारी घडली होती. याप्रकरणी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास करून २४ तासांच्या आत कास्टी श्रीगोंदा येथून तिघांची सुटका करुन तिन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली फॉर्च्यूनर आणि क्रेटा कार जप्त केली आहे.1)प्रवीण शिखरे, 2)विजय खराडे, 3)विशाल मदने (रा. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. पोलिसांनी कास्टी श्रीगोंदा येथील एका लॉजमधून 3 आरोपींना अटक करुन
तीन बाधंकाम व्यावसायिकांची सुखरुप सुटका केली.
याप्रकरणी अपहरण झालेल्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या भावाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. व सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मार्केडयार्ड पोलीस स्टेशन पुणे यांनी अमोल झेंडे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे शाखा यांना माहिती दिली.व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गुरुवारी दुपारी पुण्यातील मार्केटयार्ड येथून तिघांचे अपहरण केले. यानंतर आरोपींनी एका व्यक्तीच्या मोबाईलवरुन त्यांच्या भावाशी संपर्क साधला.तिघांना सोडवायचे असेल तर 50 लाख रुपये द्या असे आरोपींनी सांगितले.तसेच व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडिओ कॉल करुन मारहाण करीत असल्याचे फिर्यादी यांनी सांगितले. फिर्यादींनी सांगीतले होते. याबाबत गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी घटनेचे गांर्भीर्य लक्षात घेवुन, गुन्हे शाखेची ५ पथके तयार केली होती. त्यानुसार सिसिटीव्ही तपासणी व तांत्रीक विष्लेषन करुन आरोपींचे शोधासाठी गुन्हे शाखेकडील पथके रवाना केली होती. पुणे ग्रामीण व अहमदनगर जिल्हयात आरोपी असलेचे निष्पन्न झाल्याने स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व पुणे ग्रामीण यांचेशी संपर्क साधुन आरोपीतांचा शोध घेणेबाबत कळविले होते. व गोपनीय पोलीसांना मिळाली कि श्रीगोंदा येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने सापळा रचून एका लॉजमधून तिघांना ताब्यात घेतले. यावेळी आरोपीचे पाच ते सहा साथीदार पसार झाले असून पुणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. प्रकरणी मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चालु आहे. गुन्हा दाखल करुन पुढील तपास करण्यात येत आहे.सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, अमोल झेंडे,सहायक पोलीस आयुक्त गुन्हे, गजानन टोम्पे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील सुनिल पंधरकर अजय वाघमारे, सपोनि विकास जाधव, सपोनि विशाल मोहिते, सपोनि कृष्णा बाबर पोउपनि मोहन जाधव, अविनाश लोहोटे व गुन्हे शाखा पुणे कडील पथकात नेमण्यात आलेल्या अंमलदार यांनी केलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.