Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शिक्षक म्हणजे हजारो विद्यार्थ्यांना ज्ञान देत त्यांना मोठे करायचे काम घडवत असतात. शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य घडत असते मात्र असे असले तरी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी गावात स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शाळेत शिक्षक पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या शाळेत इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाने नववी आणि दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत मुलींसोबत गैर कृत्य केल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार गेल्या महिनाभरापासून सुरू असून याबाबत संबंधित पीडित विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर संतप्त झालेले पालकानी शाळेतील मुख्याध्यापकांना याबाबतची तक्रार केल्यानंतर संबंधित शिक्षकाने पुन्हा मुलींना धमकी देण्याचे प्रकार करू लागला.
यामुळे मुख्याध्यापकांनी तातडीने येथील गावच्या पोलीस पाटलांना बोलवून घडलेल्या घटनेची माहिती दिली. मात्र यावेळी संबंधित शिक्षक हा शाळेत आलाच नाही. यामुळे गावकऱ्यांनी त्याची उचलबांगडी करण्याची मागणी केली. त्यानुसार संबंधित शिक्षकाचे सातारा जिल्ह्यात बदली करण्याचे आदेश मुख्याध्यापकांनी देत घडलेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र असे असले तरी संबंधित शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी येथील विद्यार्थिनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
संबंधित शिक्षक हा शाळेतील नववी दहावीत शिकणाऱ्या वीस ते पंचवीस मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत त्यांच्या खांद्यावर हात टाकणं,खिशात हात घालत असल्याची तक्रार विद्यार्थिनींनी केली होती. आलेल्या तक्रारीनुसार त्वरित मुख्याध्यापकांना सदर शिक्षकाचे बदली करण्याचे आदेश दिले असून यापुढे संबंधित शिक्षकावर कडक कारवाई करू, असे शेळेवाडीचे पोलीस पाटील श्रीपती पाटील यांनी सांगितले.
समुपदेशन सुरु असताना प्रकार उघड
या शाळेत घडलेला प्रकार हा अतिशय निंदनीय असून मी त्यांचे समुपदेशन करण्यासाठी आले असता यावेळी मुलींनी हा प्रकार मला सांगितला. सध्या या शिक्षकाची दुसऱ्या जिल्ह्यात बदली झाली असली तरी तेथील मुलींना देखील हा अशाच प्रकारचा त्रास देईल याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सदर शिक्षकावर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या गीता हसुरकर यांनी व्यक्त केली.