Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोट्यवधींमध्ये आहे उर्मिलाची संपत्ती, पण नवरा मोहसीनची संपत्ती कळली का?

9

मुंबई : बॉलिवूडमधील ९० च्या दशकामध्ये आपल्या सुंदर अभिनयानं आणि बोल्डनेसमुळे अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री म्हणजे उर्मिला मातोंडकर. आज उर्मिला मातोंडकर हिचा वाढदिवस आहे. बालकलाकार म्हणून उर्मिलानं मनोरंजन विश्वामध्ये पाऊल टाकणाऱ्या या अभिनेत्रीची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. सध्या उर्मिला राजकारणामध्ये सक्रीय झाली आहे.

उर्मिलाचा जन्म १९७४ मध्ये झाला. उर्मिलानं ९० चं दशक आपल्या अभिनयानं चांगलं गाजवलं. उर्मिलानं तिच्या अभिनयाची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. उर्मिलानं अनेक सिनेमांत बालकलाकार म्हणून काम केलं. चमत्कार सिनेमातून ती प्रमुख अभिनेत्री म्हणून सर्वांसमोर आली.


राम गोपाल वर्मांसोबत जोडलं गेलं नाव

उर्मिलानं काही सिनेमांत काम केलं परंतु तिला खास ओळख मिळाली नाही. परंतु रामगोपाल वर्मा यांच्या रंगीला सिनेमा हिट झाला. त्यानंतर तिला पुन्हा एकदा लोकप्रियता मिळाली. एका रात्रीत उर्मिलाची गणना टॉपच्या अभिनेत्रींमध्ये झाली. करीअरमध्ये हे यश मिळवण्यासाठी उर्मिलाला राम गोपाल वर्मा यांची खूप मदत झाली. राम गोपाल वर्मा यांच्याबरोबर उर्मिलानं १३ सिनेमांत काम केलं. त्यात सत्या, जुदाई, चमत्कार, कुंवारा, जानम समजा करो, एक हसीना थी सारख्या सिनेमांचा समावेश होता.

वयानं लहान असलेल्या मॉडेलशी लग्न
उर्मिलानं ४२ व्या वर्षी लग्न केलं. तिच्या नवऱ्याचं नाव मोहसिन मीर अख्तर असून तो एक प्रतिथयश मॉडेल आणि उद्योगपती आहे. या दोघांमध्ये नऊ वर्षाचं अंतर आहे. मोहसिननं लक बाय चान्स सिनेमात काम केलं होतं. तसंच मनीष मल्होत्रा याच्या फॅशन मॉडेलिंगमध्ये देखील तो सहभागी व्हायचा.


सोशल मीडियावर उर्मिला सक्रीय

उर्मिला मातोंडकर सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते. ती सातत्यानं सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर करत असते. त्यावर तिचे चाहते भरभरून कमेन्ट करत असतात. उर्मिलाचे हे फोटो पाहून ती ५० च्या उंबरठ्यावर आहे कुणाला खरंही वाटणार नाही.

उर्मिलाची एकूण संपत्ती

उर्मिला मातोंडकर ही २०१९ सक्रीय राजकारणात उतरली. तिनं याचवर्षी लोकसभेची निवडणूक उत्तर मुंबईतून लढवली होती. अर्थात तिला ही निवडणूक जिंकता आली नाही. त्यावेळी उर्मिलानं जे प्रतिज्ञापत्र भरलं होतं त्यात ६८.२८ कोटी रुपये असल्याचं जाहीर केलं होतं. यात उर्मिलाकडे ४०.९३ कोटी रुपये चल आणि २७.३४ कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. उर्मिलाकडे १ कोटी २७लाख ९५ हजार रुपयांचे हिऱ्याचे दागिने आहेत.

याशिवाय तिच्याकडे १ लाख ४८ हजार रुपयांचे सोन्याची नाणी तर १७ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत. तसंच उर्मिलाकडे एका मर्सिडीजसह दोन गाड्या आहेत. तर तिचा नवरा मोहसीन याच्याकडे टाटा स्टॉर्म गाडी आहे. तसंच रॉयल एनफिल्ड डेजर्ट स्टॉर्म ही गाडी आहे. तर त्याची एकूण संपत्ती ३२.३५ कोटी रुपये चल आणि ३० लाख रुपयांची अचल संपत्ती आहे.



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.