Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
प्रदर्शनाची तारीख गुलदस्त्यात
वरूण धवनचा ‘बवाल’ हा चित्रपट ७ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र ३० मार्चला अजय देवगणचा ‘भोला’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत असल्यानं ‘बवाल’चं प्रदर्शन पुढे ढकलल्याचं सांगितलं जातंय. मात्र त्याच्या प्रदर्शनाची नवी तारीख अजूनही गुलदस्त्यातच आहे. वरूणच्या ‘जुग जुग जियो’ आणि ‘भेडीया’ या चित्रपटांनी फारशी कमाई केलेली नाही. हे लक्षात घेता चित्रपट निर्मात्यांनी ‘बवाल’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे, असं समजतं.
हे वाचा-कियाराच्या लग्नात ईशा अंबानीच्या पर्सची चर्चा, छोट्याशा हँडबॅगच्या किंमत येईल १ बीएचके फ्लॅट
राणीचा चित्रपटही गेला पुढे
अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट पूर्वनियोजनानुसार ३ मार्चला प्रदर्शित होणार होता. मात्र रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट ८ मार्चला चित्रपटगृहात येत असल्यानं ‘मिसेस चॅटर्जी…’च्या निर्मात्यांनी त्यांचा चित्रपट १७ मार्चला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
‘रॉकी और रानी’ची भेट जुलैमध्ये
रणवीर सिंग आणि आलिया भट्टचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट आलियाच्या मातृत्वामुळे पुढे ढकलून २८ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र २१ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या ‘किसी का भाई किसी की जान’ या सलमानच्या चित्रपटामुळे रणवीर आणि आलियाचा चित्रपट तीन महिने पुढे ढकलून २८ जुलैला प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
हे वाचा-कुणी ऐरिगैरी नाही आदिलची गर्लफ्रेंड; कमाईसोबत लोकप्रियतेतही राखीला देते टक्कर
कार्तिकचा सामना ‘अँट-मॅन’शी होणार
मागचं वर्ष कार्तिक आर्यनच्या ‘भुलभुलैय्या २’ या चित्रपटानं गाजवलं. त्याचा ‘शहजादा’ हा नवा चित्रपट पूर्वनियोजनानुसार २०२२च्या नोव्हेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. मात्र तरुणाईला आकर्षित करण्यासाठी तो व्हॅलेंटाईनच्या आठवड्यात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला गेला. अलीकडे मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, बॉक्स ऑफिसवर यशस्वीपणे चालू असणाऱ्या ‘पठाण’मुळे ‘शहजादा’ पुढे ढकलण्यात आलाय. आता १७ फेब्रुवारीला ‘शहजादा’चा थेट सामना ‘अँट-मॅन अँड द वास्प: क्वाटममॅनिया’ या मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या चित्रपटाशी होणार आहे. यानिमित्तानं बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील टक्कर पुन्हा एकदा चित्रपटगृहात रंगणार आहे.
चित्रपटांच्या पुढे ढकललेल्या तारखा
शहजादा – १७ फेब्रुवारी
मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे – १७ मार्च
रॉकी और रानी की प्रेम कहानी – २८ जुलै
बवाल – अघोषित
संकलन- पार्थ डोंगरे, वझे-केळकर कॉलेज