Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सासूने केली सुनेची हत्या; पुण्यातील घटना

15

पुणे,दि.०८ :-सासूने सुनेची हत्या केलेची धक्कादायक घटना पुण्यात समोर आली आहे. घरातील सर्व कामं नीट करत नाही या क्षुल्लक कारणामुळे सूनेची हत्या केली आहे. अमानुषपणे सूनेचं डोकं आपटून हत्या केली आहे. या घटनेमुळे लोहगाव परिसरात खळबळ उडाली आहे. पुण्यातील लोहगाव परिसरामध्ये ही घडली घटना आहे. या घटनेप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितू रवींद्र माळवी (वय 28) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर या प्रकरणी तिची सासू कमला प्रभुलाल माळवी (वय-49) हिला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळवी कुटुंबीय हे पुण्यातील लोहगाव परिसरात राहतात. घरात सगळे कामं करावी लागतात आणि सून घरात व्यवस्थित काम करत नाही, यावरुन दोघींमध्ये अनेकदा वादावादी व्हायची. रोजच्या वादावादीमुळे घरात कायम चिंतेचं वातावरण असायचं. दोन दिवसांपूर्वी सासू घरातील फ्रिजचा दरवाजा उघडत होती. त्यावेळी सासूचा पाय चूकून सुनेला लागला. या कारणावरुन पुन्हा एकदा दोघींमध्ये भांडणं झाली. त्यानंतर सासूचा राग अनावर झाला. तिने सून रितूला मारहाण केली, सूनेचं डोकं खाली फरशीवर आपटलं. या घटनेत रितूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला
ससुन हॉस्पीटल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.
दि ०६ रोजी ससुन हॉस्पीटल येथुन पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार रितु मालवी या महिलेचा पाय घसरुन मृत्यु झाल्याची माहिती देण्यात आली होती. सदर घटनेत काही घातपात अथवा संशयाचा प्रकार आहे का याची चौकशी करीत असतांना, मयताचे झाले तपासाचे चौकशीअंती कागदपत्राचे अवलोकन करता, रितु हिचा मृत्यु हा तीची सासु हिने किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातुन शिवीगाळ करुन केलेल्या मारहाणीत झाला होता. खुनाचा गंभीर गुन्हा लपविण्यासाठी आरोपी सासु हिने तिला उपचारासाठी दाखल केल्यानंतर तिचा पाय घसरुन बेशुध्द झाल्याची माहिती डॉक्टरांना दिली होती.व
विमानतळ पोलीसांना या घटनेत संशय निर्माण झाल्यामुळे सासु हिचेकडे केलेल्या अधिक तपासात त्यांनी सुन रितु हिस हाताने मारहान करुन फ्रिजवर ढकलुन, जमिनीवर डोके आपटुन खून केल्याची कबुली दिली. त्या दोघींमध्ये यापुर्वी देखील किरकोळ कारणावरुन वारंवार भांडणे होत होती. त्यातुनच दि. ०७ रोजी सासु हिने रागाच्या भरात सुन रितु माळवी हिस मारहाण करुन, त्या मारहाणीत ती फरशीवर पडल्यानंतर, तीचे केसाला पकडुन तीचे डोके जमीनीवर आपटुन तीला जीवे ठार मारले होते. याप्रकरणी विमानतळ पोलीसांनी आरोपी सासुविरुध्द विमानतळ पो स्टे १२७ / २०२२, भादविक ३०२,२०३,५०४ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि लहाने विमानतळ पो. स्टे. हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, परि-४, पुणे शहर, शशिकांत बोराटे, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे, किशोर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली विमानतळ पो. स्टे. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विलास सोंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती. संगिता माळी, सहा.पो.निरी.एस.एन.लहाणे, म.पो.उप निरी. समु चौधरी, सहा.पोलीस फौज शेवाळे, पोलीस अंमलदार, पठाण व तोडेकर यांनी केलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.