Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Pune Crime News | गुन्हे शाखेच्या ‘सासु’ विभागाकडून बिबवेवाडी व मार्केट यार्ड येथे जुगार अड्ड्यावर छापा

8

पुणे,दि.२६:- पुणे शहरातील बिबवेवाडी व मार्केट यार्ड परिसरात सुरु असलेल्या जुगार
अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून १८ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला
या कारवाईत रोकड आणि जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.मार्केटयार्ड परीसरात रम्मी पत्त्याचा जुगार व बिबवेवाडी परीसरात कल्याण मटका जुगार खेळत व खेळवत जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने तेथे छापा टाकून १८ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी रोकड आणि जुगाराचे साहित्य असा ५२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एकूण १८ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध मार्केट यार्ड व बिबवेवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे,अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, अजय राणे, बाबा कर्पे, हणमंत कांबळे, संदीप कोळगे, अमित जमदाडे, किशोर भुजबळ, ओंकार कुंभार या पथकाने केली आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.