Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुणे महानगरपालिका पर्यावरण विभागातर्फे “माझी

13

पुणे,दि.३१:- माझी वसुंधरा अभियान दूत सन्मान सोहळा आज दि.३१.रोजी सकाळी ११.०० वाजता पुणे शहरातील पुणे महापालिकेच्या श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, येथे “पर्यावरण दूत” सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्र शासन पर्यावरण व हवामान बदल विभागाने महाराष्ट्र राज्यात विविध स्थानिक स्वराज संस्था पुणे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत यासाठी माझी वसुंधरा अभियान सुरु केले आहे. पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने हवामान बदल आणि पर्यावरणीय समस्यां बद्दल नागरिकांना जाणीव करून देण्यासाठी व पर्यावरणाच्या

सुधारणेसाठी प्रयत्न करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी वसुंधरा अभियान हा सर्वांगीण उपक्रम हाती घेतला आहे. माझी वसुंधरा अभियानामध्ये भूमी (पृथ्वी), हवा (वायु), पाणी (जल), ऊर्जा (अग्नी) आणि शिक्षण आणि वृद्धी (आकाश ) या पाच पंचतत्वांचा समावेश आहे. या कार्यक्रम प्रसंगी पर्यावरण तज्ञ डॉ. इराच भरुचा, भारती विद्यापीठ यांचे द्वारे सादरीकरण करण्यात आले, पुणे महानगरपालिकेतर्फे उप आयुक्त, पर्यावरण माधव जगताप, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे व इतर अधिकारी व उपस्थित होते.

माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत विविध क्षेत्रातील संस्थांच्या प्रतिनिधींना त्यांनी केलेल्या उल्लेखनिय कामगिरी बद्दल पर्यावरण दूत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. व अनुज खरे, राजीव पंडित, डॉ. केतकी घाटे, डॉ. राजेश मणेरीकर, हर्षद बर्डेकर, सत्या नटराजन, डॉ. रितु परचुरे, रणजित गाडगीळ, संस्कृती मेनन, मौक्तिक बावसे, अमित वाडेकर, डॉ. गुरुदास नुलकर, डॉ. हिमांशू कुलकर्णी, अमोल उंबरजे, शैलेजा देशपांडे, डॉ. प्रसन्न जोगदेव, अनंत घरत, दयानंद पानसे, डॉ. हेमा साने, अमिताब मलिक, वैशाली पाटकर, डॉ. रुपालि गायकवाड, शिवम सिंग, डॉ. प्रियदर्शनी कर्वे. यांना सन्मानित करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.