Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पिंपरी चिंचवड,दि.०१:- पिंपरी चिंचवड परिसरातील काही दिवसांपूर्वी वाहने चोरीला जात होत्या व त्यांचा शोध लागत नसल्याने हैराण झालेल्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी आता आपले लक्ष भंगार व्यवसायिकांकडे केंद्रित केले आहे.
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने निगडीमधील दोन भंगार व्यावसायिकांवर छापा टाकून त्यांना अटक केली आहे. व वाहने विकणाऱ्या सराईत गुन्हेगार व चोरीची वाहने खरेदी करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये अकरा वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
सुधीर उर्फ लखन मधुकर कांबळे (वय 33, रा. चिंचवड), रशीद मन्सूर शेख (वय 34, रा. निगडी), अन्वर शफी शेख (वय 43, रा. निगडी), मयूर सुखदेव हराळ (वय 34, रा. चिंचवड. मूळ रा. अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
वाहन चोरीच्या उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना खंडणी विरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार ओटास्कीम निगडी येथे येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून सुधीर कांबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने निगडी परिसरातून एक दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. त्यावरून त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आसुन.
आरोपी सुधीर कांबळे हा पोलीस कोठडीत असताना पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने पिंपरी चिंचवड शहर परिसरातून आणखी दुचाकी चोरल्याचे सांगितले. यामध्ये निगडी, दिघी पोलीस ठाण्यातील दोन, चिखली, चिंचवड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी तीन आणि सांगवी पोलीस ठाण्यातील एक असे एकूण 11 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी दोन लाख 90 हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी जप्त केल्या. तर आरोपी सुधीर याने पाच दुचाकी वाहने रशीद आणि अन्वर या दोन भंगार व्यावसायिकांना दिली असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी रशीद आणि अन्वर या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी पाच दुचाकी वाहने कटरच्या साह्याने कापून त्याची भंगरात विक्री केल्याचे समोर आले. तसेच या आरोपींकडून मयूर हराळ याने दोन दुचाकी विकत घेतल्या होत्या. त्यामुळे त्याला देखील पोलिसांनी अटक केली.
आरोपी सुधीर कांबळे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध जबरी चोरी घरपोडी वाहन चोरी असे एकूण बारा गुन्हे दाखल आहेत.सदर कारवाई विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मनोज लोहीया, सह पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ. प्रशांत अमृतकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा.पो.उप निरी. अशोक दुधवणे, अमर राऊत, पोलीस अंमलदार रमेश गायकवाड, सुनिल कानगुडे, निशांत काळे, रमेश मावसकर, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कु-हाडे, आशिष बोटके, गणेश गिरीगोसावी, शैलेश मगर, सुधीर डोळस, प्रदीप गायकवाड, प्रदीप गुट्टे व तांत्रिक विश्लेषक पोहवा नागेश माळी यांचे पथकाने केली आहे.