Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे,दि.२५ :- पुणे शहर परिसरातील केसनंद फाटा नगर रोड लोणीकंद,परीसरात बेकायदेशीरपणे एका ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम मटका, व सोरट, बिंग, इतर प्रकारचे जुगार खेळत व खेळवत असलेल्या जुगार अड्ड्यावर पुणे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला.या कारवाईत पोलिसांनी २३ जणांनान ताब्यात घेऊन ५४ हजार ७९० रुपयेचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवार (दि.०३) रोजी केली आहे. लोणी पोलिस ठाणे हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पाळत ठेऊन पोलिसांनी छापा टाकला असता काही जण पैशांवर जुगार खेळताना आणि खळवत होते. पोलिसांनी २३ जणांना ताब्यात घेऊन रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण ५४ हजार ७९० रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी २३ जण जुगार खेळताना मिळुन आलेले विरूध्द लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुरनं. ४२७ / २०२३, महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कारवाई
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार,पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावर्ते, तुषार भिवरकर, इम्रान नदाफ, अमित जमदाडे, किशोर भुजबळ या पथकाने यशस्वी केली आहे.