Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

घरची परिस्थिती बेताची तरीही क्रिकेटर बनण्याचं स्वप्न, KKR चा नवा हिरो रिंकू सिंहच्या शिक्षणाबद्दल जाणून घ्या

6

Rinku Singh Education Details: इंडियन प्रीमियर लीग २०२३ च्या १३ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या रिंकू सिंगने गुजरातविरुद्ध शेवटच्या षटकात सलग ५ षटकार मारून खळबळ उडवून दिली. सामन्याच्या शेवटच्या षटकात केकेआरला विजयासाठी २९ धावांची गरज होती, तर रिंकू सिंग आणि उमेश यादव केकेआरसाठी क्रीजवर होते. ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर उमेशने सिंगल घेत रिंकूला स्ट्राईक दिली. त्यानंतर त्याने जे झालं ते आयपीएलच्या इतिहासात कायमचे नोंदले गेले आहे. दरम्यान रिंकू सिंगच्या शिक्षण आणि करिअरविषयी जाणून घेऊया.

रिंकूने यश दयालच्या शेवटच्या षटकात सलग पाच षटकार ठोकत कोलकाताला संस्मरणीय विजय मिळवून दिला. उमेश यादवने पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली आणि कोलकाताला पाच चेंडूंवर २८ धावा कराव्या लागल्या. येथून रिंकूने शेवटच्या पाच चेंडूत षटकार ठोकले. कोलकाताला विजेतेपद मिळवून देणाऱ्या या खेळाडूची कहाणी अनेक तरुणांना प्रेरणा देते. कठीण परिस्थितीतही रिंकूने हार मानली नाही आणि स्वत:चे नाव कमावले.

रिंकू सिंग हा मूळचा उत्तर प्रदेशातील अलीगढचा राहणारा आहे. येथूनच त्याने बालपणीचं शिक्षण पूर्ण केलं. रिंकूची आयपीएल पर्यंत पोहोचण्याची कहाणी त्रास आणि दुःखांनी भरलेली आहे. रिंकूचे वडील अलीगडमध्ये गॅस सिलिंडरचे वाटप करायचे. रिंकू हा पाच भावंडांपैकी एक आहे. रिंकूला शालेय जीवनापासून क्रिकेटची खूप आवड होती आणि फावल्या वेळात तो मित्रांसोबत क्रिकेट खेळायचा. यात त्याला खूप आनंद मिळायचा. रिंकूने कोलकाता नाईट रायडर्सच्या वेबसाईटवरील व्हिडिओमध्ये याचा खुलासा केला आहे.

आर्थिक परिस्थितीमुळे रिंकूला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्याने नववीला असताना शाळा सोडली.यादरम्यान कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे रिंकूच्या वडिलांवर ५ लाखांचे कर्ज होते. वडील आणि भावाप्रमाणेच तो घराला अडचणीतून बाहेर काढण्यात व्यस्त होता. पण या कठीण काळातही रिंकूने क्रिकेट सोडले नाही. यादरम्यान त्याची उत्तर प्रदेशच्या अंडर-१९ टिममध्ये निवड झाली.
क्रिकेट खेळताना दिसलो की बाबा मला खूप मारायचे अशी आठवण तो सांगतो. मात्र २०१२ मध्ये शालेय स्पर्धेत रिंकूला बक्षीस म्हणून बाईक मिळाली. या घटनेनंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली.

त्याचे वडील बक्षीस मिळालेल्या दुचाकीवरून सिलिंडर पोहोचवण्याचे काम करू लागले. मात्र, त्यानंतरही घरची स्थिती सुधारली नाही. यानंतर रिंकूने भावाकडे कुठेतरी नोकरी लावण्याची विनंती केली. त्याच्या भावाने त्याला झाडू मारण्याच्या कामावर ठेवले पण तो एका दिवसात काम सोडून परत आला. यानंतर रिंकूने घरात स्पष्टपणे सांगितले की, त्याला फक्त क्रिकेटमध्ये नशीब आजमावायचे आहे. यानंतर सततच्या मेहनतीच्या जोरावर त्याने यूपी संघात स्थान मिळवले. आणि २०१८ मध्ये, तो मुंबई इंडियन्सच्या ट्रायल्समध्ये दिसला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.