Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Amazon च्या सेलमध्ये गेमिंग लॅपटॉप्सवर डिस्काउंटचा पाऊस, Asus, Acer, Dell HP चे लॅपटॉप्सही स्वस्तात उपलब्ध

18

Amazon Great Summer Sale 2023 : ॲमेझॉन या प्रसिद्ध ई-कॉमर्स साईटवर Amazon great summer sale सुरू झाला आहे. सर्वच गोष्टींवर या सेलमध्ये तगडी सूट ग्राहकांना मिळणार आहे. ८ मे पर्यंतच या सेलमध्ये खरेदी करता येणार असल्यानं मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंची विक्री होत आहे. अशामध्ये जर तुम्हालाही आता एखादं इलेक्ट्रॉनिक गॅजेट घ्याचं असेल तर ही बेस्ट संधी आहे. कारण अॅमेझॉनच्या या ग्रेट समर सेलमध्ये खरेदीदार विविध इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं, होम अप्लायन्सेस तसंच बऱ्याच इतर प्रकारच्या वस्तूंवर तगडं डिस्काउंट मिळवू शकतात. दरम्यान गेमिंग लॅपटॉप्सवरही भारी सूट मिळत असून Asus, HP, Acer, Dell अशा टॉप ब्रँड्सच्या लॅपटॉप्सवरही चांगली सूट मिळत आहे.यातीलच काही खास डिल्स पाहू…

Asus TUF Gaming A15

Asus कंपनीचे लॅपटॉप हे गेमिंग तसंच हेवी प्रोजेक्ट अशा कामांसाठी अगदी बेस्ट असतात. त्यांचा लूकही दमदार असल्यानं गेमिंग लॅपटॉप्समध्ये बरेच पर्याय Asus चे असतात. या यादीतील पहिलाच लॅपटॉप Asus चा असून Asus TUF Gaming A15 असं याचं नाव आहे. याची सेलमध्ये किंमत ६७,९८९ रुपये असून मूळ किंमत ही ९२,९९० रुपये आहे. हा लॅपटॉप AMD Ryzen 7 4800H, 4GB Nvidia GeForce RTX 3050 ग्राफिक्स, 12GB RAM आणि 512GB SSD द्वारे सपोर्टेड आहे.

वाचाः Samsung M53 5G स्मार्टफोनवर १० हजारांपर्यंतची सूट, तब्बल 108Mp चा आहे कॅमेरा

HP Victus 15-fa0073TX​

hp-victus-15-fa0073tx

प्रसिद्ध लॅपटॉप कंपनी HP Victus 15-fa0073TX हा या यादीत आहे. याती मूळ किंमत तब्बल लाखांहून अधिक म्हणजेच १,०१,२७८ रुपये असून हा या सेलमध्ये ७९,९९० रुपयांना मिळत आहे. हा लॅपटॉप 12th Gen Intel Core i7 प्रोसेसर, RTX3050 ग्राफिक्स आणि 8GB रॅमसह येतो. यात 144Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे

​वाचाः मला नोकरी शोधून दे किंवा एखादा जोक सांग, ChatGPT म्हणजे ॲप्लिकेशन एक आणि फायदे अनेक

Dell Gaming G15 5525

dell-gaming-g15-5525

डेल कंपनीचा Dell Gaming G15 5525 हा लॅपटॉप या यादीत असून याची किंमत ६५,९८९ अशी आहे. दरम्यान या लॅपटॉपची मूळ किंमत १,०१,४४८ इतकी असून यावर बरीच सूट मिळत आहे. डेलचा हा गेमिंग लॅपटॉप RTX 3050 ग्राफिक्स, 8GB RAM आणि 512GB SSD सह AMD Ryzen 5 6600H प्रोसेसरद्वारे सपोर्टेड आहे. लॅपटॉप Windows 11 ऑपरेटिंग सिस्टमसह प्री-इंस्टॉल केलेला आहे.

​वाचा : Amazon Great Summer Sale ला आजपासून सुरुवात, Apple, Oneplus सह या ८ फोन्सवर बंपर डिस्काउंट

MSI Katana GF66

msi-katana-gf66

MSI Katana GF66 हा MSI कंपनीचा लॅपटॉपही या यादीत आहे. ज्याची किंमत या अॅमेझॉनच्या सेलमध्ये ८४,९८९ रुपये इतकी ठेवण्यात आली असून त्याची मूळ किंमत ही १,११,९८९ रुपये इतकी आहे. हा गेमिंग लॅपटॉप Intel 12th Gen i5-12450H प्रोसेसर, 6GB RAM सह RTX 3060 ग्राफिक्स आणि 144Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह सुसज्ज आहे.

​वाचाः Smartphone Photography : फोन ‘स्वस्त’ पण फोटो येतील ‘मस्त’, फक्त ‘या’ सोप्या टीप्स करा फॉलो!

​Acer Aspire 5

acer-aspire-5

Acer कंपनीचा Acer Aspire 5 हा लॅपटॉप या यादीत असून सेलमध्ये याची किंमत ५८, ९८९ रुपये इतकी आहे. दरम्यान याची मूळ किंमत ही ८२, ९९९ रुपये इतकी आहे.
Acer Aspire 5 हा लॅपटॉप 16GB RAM, 512GB SSD आणि RTX 2050 ग्राफिक्ससह 12th Gen Intel Core प्रोसेसरद्वारे समर्थित आहे.

​वाचाः हवामानात बदल होताच AC च्या किंमतीत घसरण, ६० हजाराचा Lloyd 1.5 टन स्पिलिट एसी २७ हजारात​

Lenovo IdeaPad Gaming 3

lenovo-ideapad-gaming-3

Lenovo कंपनीचा एकमेव Lenovo IdeaPad Gaming 3
हा लॅपटॉप या यादीतअसून याची किंमत इतरांच्या तुलनेत कमी आहे. सेलमध्ये ५१,९८९ रुपयांना हा लॅपटॉप उपलब्ध असून याची मूळ किंमत ८२,४९० रुपये इतकी आहे. हा लॅपटॉप Nvidia GTX 1650 ग्राफिक्ससह जोडलेल्या Intel Core i5 11th Gen प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. लॅपटॉपमध्ये 15.6-इंचाचा FHD IPS डिस्प्ले आहे.

​वाचाः iPhone 14 घेण्याची हीच ती वेळ, ऑनलाईनसह ऑफलाईनही मोठी सूट, तब्बल ३०,००० वाचवण्याची संधी

Asus ROG Strix G15 Advantage Edition

asus-rog-strix-g15-advantage-edition

Asus कंपनीचा आणखी एक लॅपटॉप या यादीत आहे. Asus ROG Strix G15 Advantage Edition असं या लॅपटॉपचं नाव असून सेलमध्ये याची किंमत १,२४ ९८९ रुपये इतकी आहे. याची मूळ किंमत १,९७,९९० रुपये इतकी आहे. या

लॅपटॉपचे फीचर्स म्हणाल तर AMD Ryzen 9 5980HX, 12GB RX 6800M ग्राफिक्स, 16GB RAM आणि 1TB SSD स्टोरेज असे आहेत.

वाचाः Solar Storm : सूर्यावरील मोठ्या धमाक्यानंतर पृथ्वीवरही पोहोचलं वादळ, लदाखमध्ये दिसला परिणाम

Asus TUF Gaming A15 (2022)

asus-tuf-gaming-a15-2022

Asus TUF Gaming A15 (2022) हा या यादीतील Asus कंपनीचा तिसरा लॅपटॉप आहे. याची सेलमध्ये किंमत ८१,९८९ इतकी आहे. तर मूळ किंमत १,४१,९९० रुपये आहे. फीचर्स म्हणाल तर लॅपटॉपमध्ये 15.6-इंचाचा FHD 144Hz डिस्प्ले, 16GB रॅम आणि 512GB SSD स्टोरेज आहे. तसंच हा लॅपटॉप Nvidia RTX 3050 ग्राफिक्ससह येतो.

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.