Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुणे – मुंबई महामार्गावर नागरिकांना अडवून लूटणारे; तिघे पोलिसांच्या जाळ्यात

9

पिंपरी चिंचवड,दि.०८:- पुणे -मुंबई महामार्गावर नागरिकांना अडवून लूटमार करणाऱ्या तिघांना खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखेणी आरोपींना अटक केली.आरोपींकडून लॅपटाॅप, दुचाकी, कोयता, दोन मोबाइल फोन, असा एकूण ९५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.अभिषेक लक्ष्मण भोसले (वय २०), विजय सिध्दार्थ म्हस्के (वय २०), शांतकुमार चंद्रशेखर ददुल (वय २०, तिघेही रा. काळेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे -मुंबई महामार्गावर खंडणी विरोधी पथकातील पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना नंबर प्लेट नसलेली एक मोटारसायकल संशयितरित्या आढळली. पोलिसांनी दुचाकीस्वाराला थांबण्याचा इशारा केला असता तो त्याच्या इतर दोन साथीदारांसोबत पळून जाऊ लागला. पोलिसांनी मोटारसायकलचा पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यांनी पुणे -मुंबई महामार्गावर एका व्यक्तीला लुटले असल्याची कबुली दिली. या लुटमारप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी आरोपींकडून लॅपटॉप, दुचाकी, कोयता, दोन मोबाईल फोन असा एकूण ९५ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पुढील कारवाईसाठी आरोपींना देहूरोड पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी अभिषेक लक्ष्मण भोसले व विजय सिध्दार्थ म्हस्के हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरुध्द दरोडा व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई, विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, डॉ. संजय शिंदे, सह पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्रीकांत दिसले, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, पद्माकर घनवट, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १, यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा.पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा.पोलीस उप-निरीक्षक अशोक दुधवणे पोलीस अंमलदार सुनिल कानगुडे, विजय नलगे, गणेश गिरीगोसावी, किरण काटकर, प्रदीप गोडांबे व रमेश गायकवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.