Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पत्नी व सासरच्यां छळाला कंटाळून तरुणाने केली आत्महत्या

19

पुणे पत्नी व सासरच्यां छळाला कंटाळून एका तरुणाने पुण्यात आत्महत्या केली. व पत्नीने बनावट कागदपत्राद्वारे फ्लॅट व जागा स्वत:च्या नावावर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संतोषकुमार बाबासो कोरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांची आई यशोदा बाबासो कोरे (वय ५५, रा. कोळे ता. सांगोला जि. सोलापूर यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिांनी रविना संतोषकुमार कोरे (रा. वरंवड), रंजना दामोदर इरळे, दामोद इरळे, संग्राम दामोदर इरळे, गणेश दिवेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोषकुमार याचा विवाह रविना हिच्याबरोबर २०१९ मध्ये झाला होता. ते शेवाळवाडी येथील ग्रॅन्डलिला सोसायटीत रहात होते. रविना व तिच्या माहेरच्या लोकांकडून मालमत्तेसाठी त्याचा छळ होत होता. या छळाला कंटाळून संतोषकुमार याने ३१ ऑगस्ट २०२२ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. संतोषकुमार हा फोन उचलत नसल्याचे लक्षात आल्यावर चार दिवसांनंतर पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले होते.
त्याने आत्महत्या केल्यानंतर त्याची पत्नी रविना हिने त्याचे खात्यावरुन पैसे काढून घेतले.तसेच त्याच्या नावावर असलेले फ्लॅट व जागा बनावट कागदपत्रे सादर करुन स्वत:च्या नावावर करुन फिर्यादीची फसवणूक केली. यशोदा कोरे यांनी न्यायालयात धाव घेतली होती.न्यायालयाच्या आदेशानुसार सीआरपीसी १५६/३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.