Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

व्यावसायिकाला खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगार

15

पुणे,दि.११:- दर महीना पाच हजार रुपये हप्ता द्यायाचा व रोज एक क्वॉटर दारु देण्यास नकार दिल्याच्या रागातून व्यावसायिकाला चाकुचा धाक दाखवुन खंडणी मागितल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. हा प्रकार डेक्कन परिसरातील एका वाईन्स दुकान सोनल हॉलचे बाजुला कर्वेरोड पुणे येथे ११ जुलै २०२३ रोजी रात्री ७ च्या सुमारास घडला. याप्रकरणी एका जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरज रोहीदास नलावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सतिष शंकरलाल मुलचंदानी वय ४० वर्ष धंदा व्यापार रा. वाकड पुणे हडपसर) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या वाईन्सच्या दुकानात असताना तिथे आलेल्या सुरज नलावडे याने दर महीना पाच हजार रुपये हप्ता द्यायाचा व रोज एक क्वॉटर दारु द्यायाची अशी मागणी केली व त्यला दारु व पाच हजार रुपये हप्ता न दिल्याने
याचा राग मनात धरुन आरोपीने त्यांच्यासोबत वाद घातला. त्यांच्या चाकुचा धाक दाखवुन मला व माझे कामगारांना खलास करुन टाकण्याची व तुला येथे दुकान चालु देणार नाही अशी धमकी देवुन माझे कडुन एक आय.बी. कंपनीची दारुची बाटली धमकावुन घेवुन गेला, शिवीगाळ केली. तसेच त्यांना हाताने मारहाण केली. मुलचंदानी यांनी याबाबत पोलिसांना सांगितले. पोलिसांना सांगितल्याच्या कारणावरुन आरोपीने वाईन्सच्या दुकानात बोर्ड फाडुन वाईन्स चालवायचे असेल तर दरमहा पाच हजार रुपये व एक क्वॉटर दारु हप्ता मागितल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास. पोउनि.महेश भोसले, करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.