Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

तुम्हीही फोन कव्हरमध्ये नोट ठेवता? जीवघेणी ठरू शकते ही छोटीशी सवय, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

9

भारतीय लोक प्रत्येक गोष्टीचे दोन फायदे शोधून काढतात. आणि हीच खर्च वाचवण्याची सवय कधीकधी धोकादायक ठरू शकते. अशीच सवय म्हणजे फोन कव्हरमध्ये पैसे ठेवण्याची आहे. जर तुम्ही देखील फोन कव्हरमध्ये पैसे ठेवत असाल तर लगेचच ही सवय बदलून टाका, कारण हे तुमच्या जीवावर बेतू शकतं. कारण फोन कव्हरमध्ये पैसे ठेवल्यामुळे फोनला आग लागण्याची शक्यता वाढते.

तुम्ही बऱ्याचदा अनुभवलं असेल की जेव्हा तुम्ही फोन बराच वेळ वापरता तेव्हा फोन गरम होतो. खासकरून कॉलिंग किंवा व्हिडीओ बराच वेळ पाहत असाल तर तेव्हा प्रोसेसर देखील फुल स्पीडनं चालतो. त्यामुळे प्रोसेसर मधून उष्णता बाहेर पडते आणि फोन गरम होतो. अशावेळी फोन कव्हरमध्ये असलेली नोट ही हीट वाढवण्याचे काम करते.

वाचा: Gmail Translate Feature: भलामोठा इंग्रजी ई-मेल आता चुटकीसरशी दिसणार मराठीत; डिक्शनरी शोधण्याची गरज नाही

फोनमधून निघणारी हीट निघण्यासाठी कव्हर आणि नोट मुळे अडथळा येतो. त्यात फोनमधील केमिकल रिऍक्शनमुळे स्फोट झाल्यास हीच नोट आग वाढवण्याचे काम करते. त्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते. अलीकडेच फोनमध्ये स्फोट झाल्यामुळे एका मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती. त्यामुळे फोन कव्हरमध्ये पैसे तसेच इतर वस्तू ठेवणं बंद केलं पाहिजे.

फोनसाठी योग्य कव्हर कोणतं

जर तुम्ही फोनमध्ये जास्त टाइट कव्हरचा वापर करत असाल तर फोनमधून हीट बाहेर पडू शकत नाही. त्यात जर नोट किंवा कागद इत्यादीची भर पडली तर ही हीट आवाक्याबाहेर वाढू शकते. आणि आग लागण्याच्या शक्यता वाढते. त्यामुळे तज्ज्ञ फोनवर टाइट कव्हर न वापरण्यास सांगतात.

वाचा: Tecno Pova 5 Pro 5G Price: ८जीबी रॅम असलेल्या स्वस्त फोनवरही १००० रुपयांची सूट, आजपासून विक्री सुरु

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.