Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, हा बहुचर्चित पूल होणार मुदतीपूर्वी

10

पुणे,दि.०६:- पुणे शहरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात दुमजली डबल डेकर पुलाचे काम वेगाने सुरू आहे. या पुलाचे काम मुदतीपूर्वी करण्याचे आदेश पुणे मेट्रोपॉलिटन रीजन डेवलपमेंट अथॉरिटी कडून देण्यात आले आहे. हा पूल नोव्हेंबर २०२४ मध्ये पूर्ण होणार होता. आता तो ऑगस्ट २०२४ करण्याचे सांगितले आहे. चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे काम लवकर करण्याचे सांगितले होते. त्यानंतर यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

पुणे विद्यापीठ चौकातील कधी सुरु झाले होते पुलाचे काम

कोरोना काळात एप्रिल-मे २०२० दरम्यान पुणे विद्यापीठ चौकातील पूल पाडण्यात आला होता. त्यानंतर पीएमआरडीएने याठिकणी दुमजली पूल बांधायची घोषणा केली होती. पुलाच्या पहिल्या मजल्यावर दुचाकी-चारचाकी वाहने धावणार तर त्यावरून मेट्रो धावणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर २३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचे काम सुरु आहे. या ठिकाणी पुणे विद्यापीठात दुमजली पूल केला जात आहे.

पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रो कधी सुरु होणार

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे. हे काम एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण करा, त्यासाठी राज्य सरकारकडून सर्व परवानगी आणि मदत दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत सांगितले होते. त्यामुळे ही मेट्रोही लवकर सुरु होणार असण्याची अपेक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.