Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षा २०२३ च निकाल या दिवशी लागणार; ऑनलाइन Answer Key आणि Result लवकरच प्रदर्शित करणार

8

Maharashtra Talathi Result 2023: महाराष्ट्र महसूल विभागाच्या वतीने घेण्यात आलेली तलाठी भरती परीक्षा ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत पार पडली. आता परीक्षा दिलेले उमेदवार महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ च्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. Maharashtra Talathi Exam 2023 निकाल लवकरच अधिकृत वेबसाइट mahabhumi.gov.in वर उपलब्ध होणार असल्याचे बोलले जात आहे. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात हा निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. या निकालात पुढील टप्प्यासाठी पात्र उमेदवारांची नावेही जाहीर केली जाणार आहेत.

अधिकृत वेबसाइटवर निकाल प्रदर्शित झाल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचा निकाल पाहता येणार आहे. शिवाय, TCS च्या अ‍ॅपच्या माध्यमातूनही उमेदवारांना हा निकाल पाहता येणार आहे. तलाठी भरती परीक्षेचा प्रदर्शित झाल्यानंतर तुमचे नाव गुणवत्ता यादीत असल्यास, नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांनी तयार असणे आवशयक आहे.

(वाचा : NHB Recruitment 2023: नॅशनल हाऊसिंग बँकेत अनेक पदांसाठी भरती; असा करा अर्ज)

राज्यभरात पार पडलेल्या तलाठी भरती परीक्षेसाथी अर्ज केलेल्या १० लाख ४१ हजार ७१३ उमेदवारांपैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्यात आली. त्यानुसार १७ ते २२ ऑगस्ट दरम्यान पहिला टप्पा, २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान दुसरा टप्पा आणि ४ ते १४ सप्टेंबर दरम्यान तिसरा टप्पा; अशा पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल दिवाळीपूर्वी लावण्यासाठी भूमी अभिलेख विभाग प्रयत्नशील आहे.

ही परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीच्या सर्व्हरमध्ये निकालाची माहिती एकत्रित जमा करण्यात आली आहे. त्यानंतर कंपनीकडून नमुना उत्तरपत्रिका (Answer Key) जाहीर करण्याची मागणी भूमी अभिलेख विभागाकडे केली जाणार आहे. त्यानंतर परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या लॉगइनमध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पाहता येणार आहेत. त्यानंतर उमेदवारांना काही आक्षेप असल्यास तो नोंदविता येणार आहे. त्याकरिता मुदत दिली जाणार आहे. प्राप्त आक्षेप, हरकती टीसीएस कंपनीच्या समितीकडे जाऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर दिवाळीच्या पूर्वी परीक्षेचा निकाल लागण्याची आशा वर्तवली जात आहे.

महाराष्ट्र तलाठी निकाल 2023 तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी :

  1. महाराष्ट्र महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइट mahabhumi.gov.in वर जा.
  2. वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर ‘परिणाम’ किंवा ‘निकाल 2023’ विभाग पहा आणि त्यावर क्लिक करा.
  3. उपलब्ध परीक्षांच्या यादीतून ‘महाराष्ट्र तलाठी परीक्षा 2023’ निवडा.
  4. तुम्हाला तुमचा रोल नंबर किंवा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख यासारखे परीक्षेचे तपशील प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल.
  5. आवश्यक माहिती प्रविष्ट केल्यानंतर, ‘सबमिट’ किंवा ‘निकाल तपासा’ बटणावर क्लिक करा.
  6. एकदा तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित झाला की, तुम्ही ते PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता. भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट तुमच्याकडे ठेवा.

(वाचा : National Testing Agency ने जाहीर केले २०२४ मधील परीक्षांचे वेळापत्रक, यादिवशी होणार CUET, NEET, JEE आणि UGC परीक्षा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.