Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात; एकाचा मृत्यू

10

पुणे,दि.२४ कात्रज वरुन येणाऱ्या ट्रकने नवले पुलाजवळ उभ्या असणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनांना धडक दिली. त्यामुळे समोर असणाऱ्या इतर पाच वाहनांनाही धडक बसून विचित्र अपघात झाला यात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून संदेश बानदा खेडेकर (वय: ३४ वर्षे, रा.टिळेकर नगर, इस्कॉन मंदिराजवळ, कात्रज – कोंढवा रस्ता, पुणे) असे त्या तरुणाचे नाव आहे.ही घटना बुधवारी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी ट्रकचालक पंकज राजाराम नटकरे ( वय: २१ वर्षे, रा. बसवकल्याण, बिदर,कर्नाटक) यास सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. नवले पुल परिसरात वारंवार अपघात घडत असल्याने प्रशासनाच्या विरोधात यावेळी नागरिकांनी संताप व्यक्त केला.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

मिळालेली माहिती अशी की, कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेने निघालेला ट्रक क्रमांक (KA 56- 3165) यावरील चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने उभ्या असणाऱ्या चारचाकी वाहनाला पाठीमागून धडक दिली. यात चार चारचाकी वाहने व एका दुचाकीचा विचित्र अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. तर चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेचे वृत्त समजताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे तसेच पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदारानी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मुख्य रस्त्यावर अपघात झाल्याने थोड्या वेळाकरिता वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी तत्काळ अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.

Leave A Reply

Your email address will not be published.