Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे ग्रामीण,दि.१३:- सोमवती अमावास्ये निमित्त जेजुरी गडावर भाविकांनी प्रचंड गर्दी झाली आहे. सकाळी खंडोबा देवाच्या पालखीचे कऱ्हा स्नानासाठी प्रस्थान झाले. त्यानंतर इतर धार्मिक विधी पार पडत आहे.
सोमवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास खंडोबा देवाची पालखी कऱ्हा नदीत स्नानासाठी मार्गस्थ झाली. या पालखीसोबत सोमवतीअमावास्ये निमित्त दुपारी खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या स्नानाचा सोहळा होणार आहे. पालखी कऱ्हा नदीत आल्यानंतर भाविक मोठ्या संख्येने येत असतात.
सोमवतीअमावास्ये निमित्त यात्रेच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सोमवारी (दि. 13) वाहतूक बदल करण्याचे आदेश दिले आहेत.
Thank you for reading this post, don’t forget to subscribe!
सोमवारी पहाटे पाच वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 आणि पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील वाहतुक बदल – सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी-सासवडकडे येणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे सोलापुर महामार्ग क्रमांक 65 वरुन पुणे यामार्गाने वळविण्यात आली आहेत. पुण्याकडून बारामतीकडे येणारी वाहतुक बेलसर-कोथळे-नाझरे-सुपे-मोरगाव रोड मार्ग बारामती या मार्गे वळविण्यात आली आहे.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील वाहतुक बदल – बारामती व निरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजूकडे जाणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद करुन ती मोरगाव-सुपा-केडगाव चौफुला मार्गे सोलापुर महामार्ग क्रमांक 65 वरुन पुणे या मार्गे वळविण्यात आली आहे.
सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील वाहतुक बदल – पुणे बाजुकडून जेजुरी मार्गे फलटण-सातारा बाजुकडे जाणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपुर-कापुरहोळ मार्गे सातारा-फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परींचे-वीर-वाठार मार्गे लोणंद या मागे वळविण्यात आली आहे. हे निर्बंध यात्रेसाठी येणाऱ्या हलक्या वाहनांसाठी शिथिल जेजुरीत आहेत.