Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे,दि.०१ :- पुण्यात मनसैनिकांनी जंगली महाराज रस्ता,सह टिळक रस्त्यावरील इंग्रजी अक्षरात लिहिलेल्या दुकानांच्या पाट्या फोडल्या, अंदाजे ४० ते ५० दुकानांच्या पाट्या यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्या.
मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपल्यानंतर इंग्रजी मध्ये असणाऱ्या दुकानांच्या पाट्यांविरोधात पुण्यात मनसैनिक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्याच दरम्यान आज मनसेचे कार्यकर्ते जंगली महाराज रोडवरील हॉटेल, दुकानांवरील इंग्रजी नावाच्या पाट्यांविरोधात आंदोलन करण्यात आले. तर यावेळी दुकानांचे बोर्ड फोडण्यात आले.
मागील कित्येक वर्षांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार दुकान, हॉटेलवर असणार्या इंग्रजी पाट्यांविरोधात मनसैनिक आंदोलन करीत आहे. न्यायालयाने देखील घेतली. राज्यातील दुकान, हॉटेल यावरील मराठी पाट्या लावण्याची सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपल्यानंतर आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे.
Thank you for reading this post, don’t forget to subscribe!
पोलिसांनी मनसे कार्यकर्ते यांना घेतले ताब्यात
पोलिसांनी मनसेचे पुणे शहराध्यक्ष सह कार्यकर्ते यांना ताब्यात घेतले आहे. जंगली महाराज रस्त्यावरील दुकानांची बोर्डचे फोड करणाऱ्या आक्रमक मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. आज सकाळी मनसे कार्यकर्त्यांनी दुकानांवर असणाऱ्या इंग्रजी पाट्यांवर दगडफेक केली.