Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे,दि.०७:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ये-जा करण्यासाठी विद्यापीठाच्यावतीने मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे.हि बस सेवा सकाळी 10:30 वाजतापासून सुरू होणारी ही सेवा विद्यापीठ सर्व महत्त्वाच्या ठिकाणी विद्यार्थी आणि नागरिकांना पोहचण्यात मदत करणार आहे.
यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना ल कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Thank you for reading this post, don’t forget to subscribe!
बसचे थांबे कोणते असतील?
विद्यापीठाचा मुख्य प्रवेशद्वार, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र (जयकर ग्रंथालय), रसायनशास्त्र विभाग, परिक्षा विभाग, आंतरराष्ट्रीय केंद्र, मुख्य इमारत, तंत्रज्ञान विभाग, मुलींचे वसतीगृह, आरोग्य केंद्र, पुंबा, मुलांचे वसतीगृह, मुख्य प्रेवशद्वार.
बसचे वेळापत्रक कसे असेल?
सकाळी 10:30 पासून दर अर्ध्या तासाला ही बस चालणार आहे.
या सेवेमुळे विद्यार्थी, प्राध्यापक, सेवक आणि नागरिकांना निश्चित मदत होणार आहे. हा प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी विद्यापीठातर्फे अॅप तयार केले जाणार आहे. ज्यामुळे बस नेमकी कुठे आहे, किती वेळात कोणत्या थांब्यावर पोहचेल यांची माहिती वापरकर्त्यांना मिळेल, असं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी सांगितलं.