Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जावयाला सासुरवाडीत बेदम मारहाण पुण्यातील घटना

12

पुणे,दि.१२:- पुण्यातील धनकवडी परीसरात सासुरवाडीत जाणे एका जावयाला पत्नीला भेटण्यास गेलेल्या महागात पडले. सासरकडील लोकांनी कौटुंबिक वादातून जावयाला मारहाण केली. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

राजेश तुळसीराम उणेचा (वय ३४, रा. कुलभुषण सोसायटी, बिबवेवाडी-कोंढवा रस्ता ) असे जखमी झालेल्या जावयाचे नाव आहे. उणेचा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सासू हेमलता मूलचंद डांगी (वय ५०), सासरे मूलचंद पुखराज डांगी (वय ५५), मेहुणा प्रथमेश मूलचंद डांगी आणि पूजा मुलचंद डांगी (सर्व रा. मयुर कॉम्प्लेक्स, धनकवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उणेचा यांचा माहेरकडील मंडळीशी वाद झाला होता. वादामुळे त्यांची पत्नी माहेरी आली होती. पत्नीला भेटण्यासाठी उणेचा आल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाला. उणेचा यांना सासरकडील मंडळींनी बेदम मारहाण केली. मारहाणीत उणेचा यांच्या डोक्याला दुखापत झाली. पुढील तपास सहकारनगर पोलिस करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.