Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लोणी काळभोर परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळीला पुणे शहर पोलिस आयुक्तांनचा दणका मोक्का अंतर्गत कारवाई ‘!

24

पुणे,दि.१६ :- एका तरुणावर प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी करणाऱ्या वैभव उर्फ गोट्या तरंगे व त्याच्या 2 साथीदारांवर पुणे शहर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत 99 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केलेली आहे.

याप्रकरणी वैभव उर्फ गोट्या राजाराम तरंगे (वय- 20 रा. दत्तवाडी, उरुळी कांचन), सागर अरुण सिन्हा (वय-19 रा. उरुळी कांचन), यश लोणारी (रा. तुपे वस्ती, पुणे) गुन्हा दाखल करुन तरंगे व सिन्हा यांना अटक केली आहे. याबाबत 25 वर्षीय तरुणाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 5 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन येथील दत्तवाडी येथे घडली होती.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील प्रस्ताव
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी परिमंडळ- 5
पोलीस उपायुक्त आर राजा यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) अपर पोलीस आयुक्त गुन्हे
रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा,
पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे,
सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार, शिवशांत खोसे,
तपास पथकाचे पोलीस अंमलदार तेज भोसले, संदीप घनवटे, आशितोष गवळी, मल्हारी ढमढेरे, रोहिणी जगताप यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.