Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुण्यातील पाषाण परिसरातील उच्छभ्रू भागातील भों

27

पुणे,दि.१७:- पुणे : पुणे शहरातील पाषाण परीसरातील उच्चभ्रू भागात कन्सल्टन्सीच्या नावाखाली जादूटोणा करत असलेल्या एका तरुण महिलेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, व चतुःश्रृंगी पोलीसांनी व पीडित व्यक्तीने स्टिंग ऑपरेशन करून पर्दापाश केला आहे.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

नैराश्य दूर करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी युवकाला औषधोपचार घेण्यापासून रोखून त्याला गंडेदोरे बांधून राख खायला दिली. पाय धुतलेले पाणी प्यायला दिले. अंगी अंतींद्रिये शक्ती असल्याचे भासवून युवकाला भीती घातली. युवकाची सुमारे दीड लाख रुपयांची फसवणूक करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याच
प्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात वृषाली संतोष ढोले शिरसाठ (वय 39, रा. वंशज गार्डन, पाषाण) या महिलेसह साथीदार माया राहुल गजभिये (वय 45, रा. विठ्ठलनगर, पाषाण) आणि सतीश चंद्रशेखर वर्मा (वय – ३३, रा. गणेश हॉस्टेल, पाटीलनगर, बावधन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झाल्याप्रकरणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या पाषाण परिसतील 23 वर्षीय युवकाने फिर्याद दिली आहे.

जादूटोणा विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव, पोलीस उपनिरीक्षक विद्या पवार करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.