Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राज्यभरात घरफोड्याचे गुन्हे दाखल असणारा गुन्हे

48

पुणे,दि.१८:- पुण्यासह राज्यभरात दरोडा व घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पुणे शहर गुन्हे शाखा युनिट सहाच्या जाळ्यात. त्याच्याकडून सहा लाख रुपये किमतीचे सुमारे अर्धा किलो सोने जप्त करण्यात आले.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

पुण्यासह राज्यातील विविध पोलीस ठाण्यात 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

हंसराज रणजितसिंग टाक ( वय 18, रा हडपसर ) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट सहा करत असताना गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली की टाक हा कॅनॉल रोड हडपसर येथे येणार असल्याचे समजले. त्याला सापळा रचून पकडण्यात आले. त्याने हडपसर येथील गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यावर पुण्यातील सहा पोलीस ठाण्यात घरफोड्या व दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.
गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-६, रजनीश निर्मल, यांचे मार्गदर्शनाखाली भैरवनाथ शेळके, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-६, हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही पुणे शहर पोलीस आयुक्त. रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) व अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २. सतिश गोवेकर, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रजनीश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, सुरेश जायभाय, अंमलदार विठ्ठल खेडकर, नितीन मुंडे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, नितीन धाडगे, महेंद्र कडु, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.