Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

PMT बसची बॅटरी चोरणार्यास स्वारगेट पोलिसांनी शिताफिने केली अटक…

10

पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये मोबाईल व बॅटरी चोरी करणाऱ्या चोरटयास स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद….

पुणे(सायली भोंडे) – सवीस्तर व्रुत्त असे की,स्वारगेट पोलिस ठाणे पुणे शहर गुन्हा रजि. नं. ३७ / २०२३ भा.द.वि कलम ३७९ मधील फिर्यादी यांचे पीएमटी बस क्रमांक एम.एच.१२ एच / बी ०३९९ ही बस सणस ग्राऊंड समोरील रोडवर पार्क ठेवली असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने सदर गाडीची बॅटरी चोरुन नेली आहे. म्हणून वरील प्रमाणे फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
दाखल गुन्हयातील चोरीस गेले वाहनाचा व अज्ञात चोरटयाचा हददीमध्ये शोध घेत असताना तपास पथकातील पोलिस अंमलदार फिरोज शेख, दिपक खंदाड व संदीप घुले यांना त्यांचे खास
बातमीदारमार्फत बातमी मिळाली कि. दाखल गुन्हा केलेले इसम हे जेधे चौक स्वारगेट येथील अंडाभुर्जीचे स्टॉलजवळ थांबले आहेत. अशी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली असल्याबाबत तपास पथकाचे अधिकारी सहा पोलिस निरीक्षक प्रशांत संदे यांना माहिती दिल्याने त्यांनी लागलीच सदरबाबत
आम्हांस माहिती दिली असता आम्ही खात्री करुन कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले होते. त्यावरुन सहा.पोलिस निरीक्षक प्रशांत संदे व तपास पथकातील पोलिस अंमलदार पोलिस अंमलदार फिरोज शेख,दिपक खेंदाड,संदीप घुले यांचेसह मिळुन बातमीचे ठिकाणी ६.३०वा. जावुन खात्री केली असता दोन संशयित इसम दिसुन आल्याने त्यांना वरील स्टाफचे मदतीने ताब्यात
घेवुन त्यांना त्यांचा नाव व पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव व पत्ता अनुक्रमे

१) ज्ञानेश्वर शशिकांत रामटेके वय २१ वर्षे रा. डॉल्फिन चौक अप्पर पुणे व एक विधीसंघर्षीत बालक मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपासकरुन दाखल गुन्हयातील त्यांनी चोरी केलेले बॅटरी, गुन्हयात वापरलेले वाहन व पुणे शहर परिसरातुन चोरी केलेले एकुण २९ मोबाईल फोन असा एकुण ४,९०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही  प्रविणकुमार पाटील,अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, स्मार्तना पाटील, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर, नारायण शिरगांवकर,सहा.पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक  सुनिल झावरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके,पोलिस अंमलदार  शिवदत्त गायकवाड, अनिस शेख,  फिरोज शेख, रमेश चव्हाण, संदीप घुले,  दिपक खेंदाड, सुजय पवार,सोमनाथ कांबळे यांनी एकत्र मिळुन केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.