Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अकोला स्थागुशा पथकाने गोवंश चोरी करणारी टोळी गजाआड करून १६ गुन्हे केले उघड…

11

अकोला स्थागुशा पथकाने गोवंश चोरी करणारी टोळी गजाआड करून १६ गुन्हे केले उघड…

अकोला (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी अकोला जिल्हयातील गोवंश जनावरे चोरी करून कत्तल करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून एकूण ११ आरोपीतांना अटक केली आहे. या मध्ये जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यातील १६ गुन्हे उघडकीस करून गुन्हयात वापरलेली इनोव्हा, टाटा व्हिस्टा, मोटारसायकल सह एकूण २०,९९,५०० रू. चा मुद्देमाल जप्त केला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, सन २०२३ मध्ये अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरे चोरीच्या मोठया प्रमाणात घटना घडत होत्या. म्हणुन पोलीस अधिक्षक अकोला यांनी आदेशित करून गुन्हे उघडकीस आणने बाबत सुचना दिल्याने स्थानिक गुन्हे शाखा, अकोला चे प्रमुख शंकर शेळके यांनी गोवंश जनावर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पथक गठीत केले. या पथकाने गोपणीय बातमीदाराकडुन तसेच तांत्रीक तपासावरून आरोपी नामे १) शेख शकील शेख जलील (वय ४२ वर्षे), रा.खैर मोहम्मद प्लॉट, अकोला २) शेख राजीक शेख रज्जाक (वय ३५ वर्षे), रा.इंदीरा नगर, वाडेगाव, ता. बाळापुर, जि.अकोला ३) मो.असलम मो. अशरफ (वय ३६ वर्षे), रा.इंदीरा नगर, वाडेगाव, ता.बाळापुर, जि.अकोला, ४) जाहीद अली राजीक अली ५) नसीर उद्दीन अलीम उद्दीन ६) गुलाम शाहीद गुलाम राजीक, ७) शेख शारीफ उद्दीन शेख अलीम उद्दीन ८) कुदरत खान अहेशान खान ९) शेख ईरफान शेख उस्मान १०) वसीम अहेमद जहुर अहेमद ११) अन्सार अहेमद मुक्तार अहेमद १२) शेख शकील शेख जलील राहणार अकोला यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी अकोला जिल्ह्यातील पो.स्टे. बार्शिटाकळी, पातुर, बाळापुर, उरळ, सिटी कोतवाली, अकोट फाईल, दहिहांडा, अकोट शहर, हिवरखेड, तेल्हारा या वेगवेगळया पोलीस स्टेशनचे एकुण गोवंश चोरीचे १६ गुन्हे उघडकीस आणुन गुन्हा करताना गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहने, मोटार सायकली, आरोपीतांचे मोबाईल एकुण ६ नग व नगदी ३,००,०००/- रू. असा एकुण २०,९९,५०० /- रू.चा मुददेमाल जप्त केला.

१) पो.स्टे. पातुर अप क. ३६३/२३ गुन्हयात एक इनोव्हा चारचाकी गाडी किं.अं.८लाख, एक बजाज पल्सर मो.सा. किं. अं. १ लाख, दोन मोबाईल ११,५००/- रू. नगदी ५००० रु. जप्त करण्यात आले.

२) पो.स्टे. पातुर अप. कं. २२५/२३ गुन्हयात १७,००० रू. जप्त करण्यात आले.

३) पो.स्टे. बाळापुर अप.क १८३/२३ गुन्हयात ३३,००० रु. जप्त. ४) पो.स्टे. बाळापुर अप. कं. ७१०/२३ गुन्हयात ३०,००० रू. जप्त.

५) पो. स्टे बाळापुर अप. कं. ७१२/२३ गुन्हयात ३३,००० रु. जप्त.

६) पो.स्टे. बार्शिटाकळी अप. कं. ९०/२३ गुन्हयात ८,००० रू. जप्त.

७) पो.स्टे. उरळ अप.कं. ३७८/२३ गुन्हयात ३२,००० रू. जप्त करण्यात आले.

८) पो.स्टे. सिटी कोतवाली अप.क. २३६/२०२३ कलम ३७९ भा.द. वि. मध्ये फिर्यादी उमेश रविंद्र लांडगे रा. अनिकट अकोला याचे गोवंश चोरण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे.

यातील वर नमुद आरोपी हे पो.स्टे. पातुर येथील अप.नं. ३६३/२३ कलम ३७९ भा.दं. वि मध्ये पुढील तपासकामी ताब्यात दिले आहे.

(पो.स्टे. अकोट फाईल अकोला)

१) अपराध नं ४९५/२३ कलम ३७९ भा.दं. वि. गुन्हयात एकुण ३,३५,०००/- रु. चा मुददेमाल जप्त करण्यात आले.

२) अपराध नं ५०२/२३ कलम ३७९ भा.दं. वि. एकुण ३५,०००/- रु. चा मुददेमाल जप्त करण्यात आले.

(पो.स्टे. हिवरखेड अकोला)

३) अपराध नं २८०/२३ कलम ३८०,३४ भा.दं. वि. १२,०००/-रु. चा मुददेमाल जप्त करण्यात आले. पो.स्टे. दहिहंडा, अपराध नं १४४/२३ कलम ३७९ भा.दं. वि. ५४,०००/- रू. चा मुददेमाल जप्त करण्यात आले. पो.स्टे. दहिहंडा, अपराध नं ३५८/२३ कलम ३७९ भा.दं.वि. ५,०००/-रू. चा मुददेमाल जप्त करण्यात आले. पो.स्टे. तेल्हारा, अकोला, अपराध नं ३७२/२३ कलम ३७९ भा.दं. वि. ६,०००/-रु. चा मुददेमाल जप्त करण्यात आले.

४) अपराध नं १०/२३ कलम ३९२,५०६,३४ भा.दं. वि. एक टाटा इंडिका विस्टा, गुन्हयात ५,३०,००० रू. जप्त करण्यात आले. पो.स्टे. तेल्हारा,अकोला, आरोपींकडून एक इनोव्हा चारचाकी वाहन, तीन टाटा इंडिका विस्टा चारचाकी वाहने, तीन मोटार सायकली, सहा मोबाईल,रोख ३,००,०००/-रू. असा एकूण असा एकुण २०,९९,५००/- रु.चा मुददेमाल जप्त करून ११ आरोपींना अटक केली आहे. आणि वरील गुन्हे केल्याचे आरोपीतांनी कबूल केले आहे.

अशा प्रकारे सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक संदिप घुगे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. शंकर शेळके, सपोनि कैलास भगत, पोउपनि, गोपाल जाधव, पोलीस अंमलदार दशरथ बोरकर, गोकुळ चव्हाण, रविंद्र खंडारे, भास्कर धोत्रे, उमेश पराये, अविनाश पाचपोर, महेंद्र मलिये, प्रमोद डोईफोडे, विशाल मोरे, लिलाधर खंडारे, भिमराव दिपके, सुलतान पठाण, खुशाल नेमाडे, अन्सार अहमद, ऐजाज अहमद, आकाश मानकर, फिरोज खान, स्वप्निल चौधरी, स्वप्निल खेडकर, धिरज वानखडे, अब्दुल माजिद, चालक पोशि. प्रशांत कमलाकर, मो.नफिस यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.