Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नवीन वर्षाच्या वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या

10

पुणे,दि.२१:- नाताळ व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहर व पुणे जिल्ह्यात मोठया प्रमाणात पार्टी व इतर कार्यक्रमांवर नजर ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकुण १२ कार्यकारी व २ भरारी पथक व ३ विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. ही पथके अवैध मद्य वाहतूक, निर्मिती आणि वाहतुकीला आळा घालतील अशी माहिती एक्साईजचे चरणसिंग राजपूत, अधीक्ष‌क राज्य उत्पादन शुल्क पुणे यांनी दिली.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

राज्य उत्पादन शुक्ल विभागाचे आयुक्त , जिल्हाधिकारी. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपआयुक्त आदेशानुसार व अधीक्षक तसेच उपअधीक्षक यांचे नेतृत्वाखाली अवैध मद्यविक्री, निर्मिती, वाहतुकीला आळा घालण्याकरिता पुणे जिल्ह्यात एकुण १२ कार्यकारी व २ भरारी पथक व ३ विशेष पथक तयार करण्यात आलेली आहेत.
पथकामार्फत रात्रीची गस्त घालण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व परवानाकक्ष अनुज्ञप्त्या व ढाबे यांचे निरीक्षण करण्यात येणार आहे.

नाताळ व नववर्षाच्या प्रारंभाच्या कालावधीत माफक दरात उच्च प्रतीचे मद्य (स्कॉच), डयुटी फ्री स्कॉच या नावाने बनावट व भेसयुक्त मद्य विक्रीचे प्रकार झाले आहेत. भेसळयुक्त मद्य विक्रीतून मद्य प्राशान करणार्‍या ग्राहकांची आर्थिक फसवणुक होते. त्याचबरोबर मद्य सेवनाने आरोग्यावर देखील परिणाम होतो. अनुज्ञप्ती धारकांनी सर्व नियमांचे पालन करुन ग्राहकांना मद्य पिण्याच्या परवान्यावर मद्य विक्री करावी. अनुज्ञप्तीधारकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कठारे कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

बोगस दारूची माहिती
अवैध व सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करताना आढळून आल्यास मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 नुसार तसेच ढाब्यांवर जागा मालकांविरुध्द सुध्दा गुन्हा दाखल करुन वैद्यकीय तपासणी करुन कडक कारवाई करण्यात येणार आहे. भेसळयुक्त व बनावट मद्य अथवा अवैध मद्यविक्रीची माहती असल्यास व तक्रार नोंदविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा 18002339999 हा टोल फ्री आणि 020-26058633 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे पुणे राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत, यांनी कळविले आहे.


 

Leave A Reply

Your email address will not be published.