Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गोंदीया पोलिसांचा हातभट्टीची दारु गाळणाऱ्यावर छापा…

9

पोलिस अधीक्षक, गोंदिया  निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी  नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारचे अवैध धंदयावर धाडी घालून प्रभावी कारवाई करण्याचे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते…

गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, वरिष्ठांचे आदेशाने उपविभागिय पोलिस  अधिकारी, उपविभाग तिरोडा,  प्रमोद मडामे, पो. स्टे. गंगाझरीचे ठाणेदार पो.नि. महेश बनसोडे, यांचे मार्गदर्शनाखाली गंगाझरी येथील पोलिस अंमलदार यांनी दिनांक- *21/12/ 2023 रोजी* गंगाझरी हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान, गोपनीय बातमीदार कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे *मौजा- जुनेवानी, जंगल परिसरात* जमिनीत खड्डा खोदून त्याची चूल तयार करून, त्या चुलीवर मोठी लोखंडी ड्रम व त्यावर एक मोठे जर्मन घमेला ठेवून मोहाफुलाची हातभट्टी दारू काढत असतांना सदर ठिकाणी पोलीसांनी धाड कार्यवाही करून घटनास्थळावरून 01 टिनाचा ड्रम, 01 लोखंडी टवरा, एक प्लास्टिक पाईप, सडवा मोहपास प्लास्टिक पोतडीतील सडवा मोहोपास 210 किलो, टिनाचे पिपे, मोहाफुलाची हातभट्टी दारू *असा एकूण 45000/- रु. चा माल* मिळुन आला.

सदर प्रकरणी पो.स्टे. गंगाझरी येथे
1) संजय धर्मराज चौधरी वय 42 वर्ष, रा. मौजा एकोडी, ता.जि. गोंदिया*

*2) रामा गौतु तुमसरे, वय 60 वर्ष, रा.एकोडी, ता.जि. गोंदिया*

*3) शशीकुमार गणपत मेश्राम, वय 45 वर्ष, रा. एकोडी, ता.जि.गोंदिया*

अपराध. क्र. 491/2023 कलम 65(ब) (क)(ड)(ई )(फ), 83 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला*

सदरची कारवाई वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली पो. ठाणे गंगाझरीचे पो.नि. . महेश बनसोडे यांचे मार्गदर्शनात पो.उप.नी. पराग उल्लेवार, पो.हवा. सुभाष हिवरे, पो.शी. राजेश राऊत, अशोक मौजे,प्रशांत गौतम यांनी केली आहे.

The post गोंदीया पोलिसांचा हातभट्टीची दारु गाळणाऱ्यावर छापा… appeared first on Policekaka Crime Beat News 24X7.

Leave A Reply

Your email address will not be published.