Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लाच स्वीकारताना पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यासह पो

96

पुणे ग्रामीण,दि.२४ :- अपघाताच्या गुन्ह्यातील गाडी परत करण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागून ८ हजार रुपये लाच स्वीकारताना पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतील मंचर पोलिस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (दि.23) मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट जवळ असलेल्या सिद्धी हॉस्पिटल जवळ करण्यात आली.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

सहायक पोलीस निरीक्षक संतोष सुरेश साळुंखे (वय ४४), पोलीस शिपाई संदीप भीमा रावते (वय -३६) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहे. याबाबत २४ वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबी कार्यालयात तक्रार केली आहे. तक्रारदार यांची अपघाताच्या गुन्ह्यातील दुचाकी परत देण्यासाठी तसेच मदत करण्यासाठी एपीआय संतोष साळुंखे व पोलीस शिपाई संदीप रावते यांनी ४० हजार रुपयांची लाच मागितली. पोलिसांकडून लाचेची मागणी होत असलेची तक्रारदार यांनी पुणे एसीबी कडे तक्रार केली.
प्राप्त तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पुणे एसीबीच्या पथकाने शनिवारी पडताळणी केली. पडताळणी दरम्यान तक्रारदार यांचे काम करून देण्यासाठी तडजोड़ी अंती दोन्ही आरोपींनी 8 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सापळा रचून. पोलीस शिपाई संदीप रावते यांना तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांना अटक केली. दोघांवर मंचर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे,
अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक नितीन जाधव,
पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण, महिला पोलीस हवालदार सरिता वेताळ,
पोलीस हवालदार नवनाथ वाळके, चालक पोलीस हवालदार कदम यांच्या पथकाने केली
नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणास कोणी शासकीय अधिकारी / कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे.
मोबाईल क्र. 9923046855
कार्यालय क्र. 020 26132802
ईमेल dyspacbpune@gmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.