Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे,दि.२६:- पुण्यातील भोसले नगर परिसरात दोन ठिकाणी घरफोडी करणाऱ्या परराज्यातील आरोपीला चतुःश्रृंगी ठोकल्या बेड्या आरोपीकडून गुन्ह्यातील 23 लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे हिरेजडीत दागिने व रोख रक्कम जप्त केली आहे.
Thank you for reading this post, don’t forget to subscribe!
नरेंद्र बाबु नुनसावत (वय-27 रा. आरटीसी कॉलनी कमान, टीकेआर कॉलेज इंदिरानगर, मीरपेठ, हैदराबाद, तेलंगणा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
भोसले नगर येथे दोन जबरी चोरीच्या घटना घडल्या होत्या. दाखल गुन्ह्याचा तपास चतुःश्रृंगी पोलिस करत असताना हद्दीतील सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी आरोपी येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. येरवडा व चतु:श्रृंगी पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करुन आरोपीला तेलंगणा राज्यातून अटक केली. आरोपीकडून चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले. पथकाने आरोपीच्या मुळ गावी जावून 23 लाख 20 हजार रुपयांचे रोख रक्कम जप्त व मुद्देमाल जप्त केला.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत.
ही कामगिरी ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार)
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन
कुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ-4 शशिकांत बोराटे,
सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी
पांढरे, पोलीस निरीक्षक गुन्हे अंकुश चिंतामण,
पोलीस निरीक्षक गुन्हे जगन्नाथ जानकर, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील,
पोलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके, पोलीस अंमलदार श्रीकांत वाघवले, ज्ञानेश्वर मुळे, इरफान मोमीन,
प्रदीप खरात, बाबुलाल तांदळे, मारुती केंद्रे, किशोर दुशिंग, बाबा दांगडे, श्रीधर शिर्के, सुधीर माने यांच्या पथकाने केली.