Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुण्यातील पीएमपीएमएलची बस सेवा संकटात; 1 हजार कोटींचा तोटा

10

पुणे,दि.२७:- पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थाची पीएमपीएमएलचा तोटा १ हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीमध्ये पीएमपीएमएलच्या बस संचलन करत आहेत.

पीएमपीएमएलला २०२०-२१ आणि २०२१-२२ ही दोन वर्षे कोरोना काळ असल्यामुळे वर्षाला प्रत्येकी ६३९ कोटींचा तोटा झाला होता. पीएमपीएमएलमध्ये ११ हजार कर्मचारी कामावर आहेत. त्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर इंधनाचे दर वाढले आहेत. पीएमपीएमएल ही ठेकेदारांकडून बस भाड्याने घेत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च यावर होत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये अनेक मार्ग सुरू करण्यात आले आहेत.

पीएमपीएमएलचा तोटा वाढत असल्यामुळे याचा भार पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरावर पडत आहे. संचलन तूट भरून देण्याचे दायित्व या महापालिकांवर आहे. आता यामध्ये पीएमआरडीएचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील वर्षात पुणे महापालिकेला सुमारे ६०० कोटी रुपये संचलन तूट द्यावी लागेल, असा अंदाज आहे.

पीएमपीएमएलला १ हजार कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता आहे. पीएमपीएमएलला सध्या महिन्याला ५० कोटींचे उत्पन्न मिळते. या प्रमाणात खर्च अधिक आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न पीएमपीएमएल प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये यावर चर्चा करण्यात येईल. – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त

Leave A Reply

Your email address will not be published.