Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रोच्या कामातील कामाचे साहित्य एका महिन्याभरात ३१ लाखांचे साहित्य चोरीस गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेट्रोचे साहित्य चोरीला जात असल्याने ते चोरटे कोण, असा प्रश्न दस्तर खुद्द पोलिसांनाच पडला आहे.
पोलिसांकडून मात्र आता त्याचा तपास कसून सुरू आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात रितेश प्रधान (वय २३, रा. थेरगाव) यांनी तक्रार दिली आहे. यानुसार, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Thank you for reading this post, don’t forget to subscribe!
आठ ठिकाणांवरून चोरी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश हे मेट्रोच्या साहित्यावर देखरेख ठेवणे आणि नजर ठेवण्यासोबतच सुपरवायझरचे काम करतात. सध्या बालेवाडी ते शिवाजीनगरमधील खैरेवाडी अशा सात ते आठ ठिकाणांवर मेट्रोचे साहित्य ठेवले गेलेले आहे. याठिकाणी दिवसरात्र काम सुरू असताना वेगवेगळ्या आठ ठिकाणांवरून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी फुट प्लेट, बेस जॅक असे तब्बल ३१ लाख ४३ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे.
महिन्याभराच्या आता लाखोंचा माल लंपास
हे साहित्य जवळपास १८ नोव्हेंबर १० डिसेंबर या कालावधीत हा प्रकार घडला आहे. आता मेट्रोकडून याची पाहणीकूरन पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आर. सी. चाळके हे करत आहेत.