Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
गोंदिया जिल्हा पोलिस दल आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथ ईस्ट, तसेच माऊली मित्र मंडळ, नागपूर यांच्या सौजन्याने आयोजित कार्यक्रमाअंतर्गत अतिदुर्गम आदिवासी भागातील गरजू गोर- गरीब विद्यार्थ्यांना पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथ ईस्ट, चे अध्यक्ष श्री. राजीव वरभे, माऊली सेवामित्र मंडळचे अध्यक्ष श्री. सुहास खरे, यांचे हस्ते सायकलींचे वाटप…..
गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फे जिल्हयातील जनतेच्या हिताकरीता (विशेषतः नक्षलग्रस्त भागातील जनतेच्या कल्याणकरीता ) कायम अग्रेसर राहुन विविध कल्याणकारी नाविण्यपूर्ण उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येत असतात,त्याचाच एक भाग म्हणुन पोलिस अधीक्षक गोंदिया, निखिल पिंगळे, यांच्या संकल्पनेतुन तसेच अपर पोलिस अधीक्षक, गोंदिया (कॅम्प- देवरी) नित्यानंद झा, यांच्या मार्गदर्शनाखाली नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्हयातील दुर्गम, अति- दुर्गम भागातील गोर- गरीब, आदिवासी भागात वास्तव्यास असणाऱ्या आणि शाळा-कॉलेज च्या शिक्षणाकरिता 5 ते 10 कि. मी. पायी पायी ये-जा करणाऱ्या अशा गरजु- गरिब व आदिवासी मुलींना पायी येण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही व जेणेकरुन त्यांचा वेळ वाचुन त्यांना शिक्षणा करिता भरपुर वेळ मिळुन अभ्यासाला वाव मिळेल व आरोग्य सुदृढ राहुन त्यांचा सर्वांगीन विकास होईल आणि पोलीस व जनता यांच्यातील संबंध सुदृढ होण्यास चालना मिळेल यादृष्टीने गोंदिया जिल्हा पोलिस दलाच्या पुढाकाराने रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथ ईस्ट, तसेच माऊली मित्र मंडळ, नागपूर यांच्या सौजन्याने आज दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी पोलिस स्टेशन सालेकसा येथे पो. स्टे. अंतर्गत येणारे सशस्त्र दुरक्षेत्र पिपरीया, बिजेपार, व दरेंकसा येथील 15 गरजु शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते….
सदर आयोजित कार्यक्रमात निखील पिंगळे, पोलिस अधीक्षक, गोंदिया, नित्यानंद झा, अपर पोलिस अधीक्षक, गोंदिया (कॅम्प- देवरी), तसेच रोटरी क्लब साऊथ ईस्ट नागपूरचे प्रेसीडेंट राजीव वरभे सर, माऊली सेवामित्र मंडळ चे अध्यक्ष श्री. सुहास खरे, यांचे हस्ते गरजू विद्यार्थ्यांना 15 सायकलींचे वाटप करण्यात आले….. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील ईतर 8 सशस्त्र दूरक्षेत्र अंतर्गत गोर -गरीब गरजू आदिवासी विद्यार्थ्यांना 40 सायकली चे वाटप करण्यात आलेले असुन सदरचे कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यात एकूण 55 सायकलींचे वाटप करण्यात आलेले आहे
वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदर कार्यक्रम यशस्वी व्हावा याकरिता संकेत देवळेकर, उपविभागिय पोलिस अधिकारी, देवरी अतिरिक्त कार्यभार आमगांव, यांचे मार्गदर्शनात बाबासाहेब बोरसे, पोलिस निरीक्षक, पो.स्टे. सालेकसा, चापोना रितेश अग्नीहोत्री, पो.शि. जितेंद्र पगरवार, मपोशि प्रिती उके तसेच नक्षल प्रोपोगंडा सेल, गोंदिया येथील पो. उप. नि हत्तीमारे, पोहवा लियोनार्ड माँर्टीन, पो.शि.भास्कर हरिणखेडे, यांनी परिश्रम मेहनत घेवून विशेष योगदान दिले आहे…