Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

देसाईगंज पोलिसांनी दारुच्या गुन्हयात जप्त केलेला १६ लक्ष किमतीचा मुद्देमाल केला नष्ट…

7


देसाईगंज पोलिसांनी दारुच्या गुन्हयात जप्त केलेला १६ लक्ष किमतीचा मुद्देमाल केला नष्ट…




पोलिस स्टेशन देसाईगंज येथील विविध दारुच्या गुन्ह्यातील एकुण १६,००,०००/- रुपयाचा जप्त मुद्देमाल केला नष्ट…

देसाईगंज(गडचिरोली) प्रतिनिधी – गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतांना अवैधरीत्या दारुची वाहतुक केली जाते. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक  निलोत्पल यांचे आदेशान्वये पोलिस स्टेशन देसाईगंज हद्दीतील अवैध दारु विक्री करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात आलेली होती. त्यानुसार पोलिस स्टेशन देसाईगंज येथील महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये प्रलंबीत दारुच्या मुद्देमालापैकी १६७ गुन्ह्यातील एकुण किंमत १६,००,०००/- रुपयाचा जप्त करण्यात आलेला मुद्देमाल काल दिनांक २७/१२/२०२३ रोजी नष्ट करण्यात आला.
अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गडचिरोली यांचे परवानगीने काल दिनांक २७/१२/२०२३ रोजी पोलिस स्टेशन देसाईगंज येथील प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक किरण रासकर यांनी राज्य उत्पादक शुल्क, गडचिरोली विभागाचे दुय्यम निरीक्षक श्री. चं. वि. भगत यांच्यासह पोलिस स्टेशन हद्दीतील विविध दारुबंदी गुन्ह्यातील जप्त मुद्येमाल नष्ट करण्यात आला. ज्यामध्ये

१) देशी दारुच्या ९० मिली मापाच्या ३६९५० बाटल्या,

२)देशी दारुच्या १८० मिली मापाच्या ३१७ बाटल्या,

३) विदेशी दारुच्या १८० मिली मापाच्या ६८० बाटल्या,

४) ७५० मिली मापाच्या विदेशी दारुच्या १७ बाटल्या,

५) ५०० मिली बियरच्या ३० टिनाचे कॅन असे एकुण ३७,९९४ बाटलाचे मुद्देमाल जेसीबिच्या सहाय्याने १० x १० चा खोल खड्डा खोदुन रोड रोलरच्या सहाय्याने कडक व मुरमाळ
जागेवरती मुद्देमाल पसरवून काचेच्या व प्लॉस्टीकच्या बॉटलांचा चुरा करण्यात आला व काचेचा चुरा व प्लॅस्टीकच्या चेपलेल्या बाटल्या जेसीबीच्या फावड्यांच्या सहाय्याने खड्यात टाकण्यात आला. तसेच खड्डा पुर्ववत बुजविण्यात आला. सदर मुद्येमालाची विल्हेवाट लावतांना पर्यावरणाची हानी होणार नाही याची
पुर्णपणे दक्षता घेण्यात आली.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक गडचिरोली  नीलोत्पल  अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) . कुमार चिंता  अपर पोलिस अधीक्षक (अभियान)  यतिश देशमुख अपर पोलिस अधीक्षक अहेरी एम. रमेश तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी कुरखेडा साहील झरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे देसाईगंज येथील प्रभारी अधिकारी  किरण
रासकर व सर्व अंमलदार तसेच राज्य उत्पादन शुल्क विभगाचे सहकारी स्टॉफ यांचे उपस्थीतीत पार पडली.





Leave A Reply

Your email address will not be published.