Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे : पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्याचा खून करण्यात
आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवार 28 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. खुनाच्या या घटनेमुळे येरवडा कारागृह पुन्हा एकदा हादरले आहे. महेश महादेव चंदनशिवे असं खून झालेल्या आरोपीचे नाव आहे. पूर्व वैमान्यासातून 4 कैद्यांकडून महेशचा खून करण्यात आल्याचं समोर आले आहे. चारही आरोपींच्या विरोधात पुण्यातील येरवडा पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कात्रीने आणि धारदार हत्याराने मानेवर वार करत महेशची हत्या करण्यात आली.
अनिकेत समदूर, महेश तुकाराम माने, गणेश हनुमंत मोटे आणि आदित्य संभाजी मुरे अशी या संशयित आरोपींची नावे आहेत. दरम्यान खून, खुनाचा प्रयत्न, तोडफोड करणे, दुखापत करणे, घातक शस्त्र, अग्नीशस्त्र बाळगणे, दरोड्याची तयारी करणे, दरोडा घालणे, चोरी अशा आरोपांखाली महेश हा येरवडा कारागृहात होता. या खूनातील चौघे संशयित देखील विविध गुन्ह्यांमध्ये कारागृहात होते. पण पूर्ववैमानस्य मनात ठेवून या चौघांनी कारागृहात महेशची हत्या केली.
पुणे प्राइम न्यूजचे अपडेटस् मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा !