Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नववर्षाच्या पुर्व संध्येला गोंदिया ग्रामीण पोलिसांनी पकडला , देशी-विदेशी दारुचा साठा….

7


नववर्षाच्या पुर्व संध्येला गोंदिया ग्रामीण पोलिसांनी पकडला , देशी-विदेशी दारुचा साठा….






पोलिस अधिक्षक  निखिल पिंगळे, अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा, यांनी मावळते वर्ष व येणारे नवीन वर्षाच्या आगमन प्रसंगी जिल्ह्यात शांतता प्रस्थापित व्हावी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता जिल्ह्यांतील सर्व पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या त्यानुसार वरिष्ठांचे आदेशानुसार संपुर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रभावी धाड कारवाईची ऑपरेशन क्रॅक डाऊन मोहीम राबविण्यात येत आहे…..

गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, उपविभागीय पोलिस अधिकारी, सुनील ताजणे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलिस निरीक्षक चंद्रकांत काळे, यांचे मार्गदर्शनात गोंदिया ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे  दिनांक- 29/12/ 23 रोजी छापा कारवाई केली असता असता *आरोपी नामे – सुजित मंगलदास डोंगरे रा. अदासी* याचे राहते घराचे घरझडतीत देशी विदेशी दारूचा साठा किंमती 77 हजार 275 रुपयांचा मुद्देमाल अवैधरीत्या मिळून आल्याने जप्त करण्यात आलेला आहे आरोपी विरुद्ध पो.स्टे. गोंदिया ग्रामीण येथे अप. क्र. 583/23 कलम 65 (इ) म.दा.का. नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

सदरची कार्यवाही  वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील  ताजने यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक  चंद्रकांत काळे, यांचे नेतृत्वात गोंदिया ग्रामीण पोलिस अधिकारी- अंमलदार यांनी केलेली आहे….



Gondia police, Gondia Rural Police, ilegal liquar, Raid, Seazed



Leave A Reply

Your email address will not be published.