Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे,दि.३१:- नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे पोलीस 31 डिसेंबरच्या रात्रीसाठी सज्ज झाले आहेत. मद्य पिऊन वाहन चालवणारे व्यक्ती, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे व्यक्ती, महिलांची छेडछाड करणारे व्यक्ती, अनधिकृत मद्य विकी करणाऱ्या आस्थापना, अंमलीपदार्थ विक्री किंवा सेवन यासारखी बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
Thank you for reading this post, don’t forget to subscribe!
पुणे शहर पोलिसांनी देखील पुणेकरांच्या सुरक्षेसाठी तसेच शांततेसाठी पुणे शहरात तीन हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
त्यासोबतच ड्रंक अँड ड्राईव्ह तसेच रोडला गोंधळ घालणारे व हुलडबाजी करणाऱ्यांवर चोख नजर असणार आहे. छेडछाड विरोधी पथके देखील रस्त्यांवर तैनात असणार आहेत. पोलिसांनी पुण्यातील मॉल्स, हॉटेल्स, चर्च, मस्जिद, मंदिर आणि संवेदनशील ठिकाणांचे चेकिंग सुरू केले आहे.
पुणे शहरात थर्टीफस्टनिमित्त मोठ्या प्रमाणात पार्ट्या तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी जमतात. तरुणाईचा लक्ष्णीय सहभाग असतो. मोठ्या जल्लोषात नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. परंतु, अनेकवेळा हुल्लडबाजांकडून गोंधळ घातला जातो. तर, मद्याच्या नशेत रस्त्यांवर व भरधाव दुचाकींवरून गोंधळ घालतात. या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पुणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
गर्दीची ठिकाणे, संवेदनशील परिसर तसेच, रेल्वे स्थानक, बस स्थानके, मॉल्स अशा ठिकाणी चेकींग सुरू करण्यात आली आहे. तसेच, महिलांची छेडछाड, पाकिट मार व चैन स्नॅचिंग यांच्यावर नजर ठेवली जाणार आहे. तर, ट्रिपल शिट व ड्रंक अँड ड्राईव्हवर देखील कारवाईसाठी वाहतूक शाखेचा वेगळा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी जलद प्रतिसाद पथक आणि दामिनी पथके देखील असणार आहेत.