Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे,दि.०२:- रंगाचे डबे असल्याचे सांगून त्यांच्या नावाखाली गोव्याहून चोरटी दारू वाहतूक करणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडला. कंटेनरमध्ये रंगाचे डब्याच्या नावाखाली १ हाजार पेक्षा जास्त मद्याचे बॉक्स असल्याचे आढळून आल्या. या प्रकरणी वाहन चालक व त्यांच्या साथीदार याला अटक करण्यात आली आहे.
Thank you for reading this post, don’t forget to subscribe!
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर चाेरून आणलेल्या मद्याचा वापर होत असल्याचे लक्षात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक कार्यान्वित झाले. दि.१ गोव्यामध्ये बनविलेली विदेशी दारू राज्यात विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती या पथकाला मिळाली. त्यानुसार या पथकाने खेड-शिवापूर टोलनाक्यावर सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर आल्यावर पोलिसांनी चौकशी केल्यावर चालकाने आत रंगाचे डबे असल्याचे सांगून त्या रंगाचे डबे बिल, टॅक्स इन्व्हाईस व ई वे बिल दाखवून चकवा देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी खात्री करण्यासाठी कंटेनर उघडला. तेव्हा आतमध्ये बियर व व्हिस्कीच्या बाटल्या आढळून आल्या.
वाहनासह अंदाजे किंमत एक कोटी रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
ही कारवाई आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक. अंमलबजावणी व दक्षता. सुनील चव्हाण यांच्या आदेशान्वये पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक चरण सिंग राजपूत, उपअधीक्षक संजय आर पाटील ,युवराज शिंदे, एस .बी. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग पुणे या पथकाने गोवा राज्यात विक्री करिता असलेल्या मद्यावर धडक कारवाई केली. दोन आरोपी अटक करण्यात आलेले असून पुढील तपास निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग करीत आहे.