Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बँक दरोड्यातील आरोपींना पोलिस कोठडी

7

बँक दरोड्यातील आरोपींना पोलिस कोठडी

धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव शहरातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवरील दरोड्याचा उलगडा करण्यात धाराशिव पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची (दि.08 जानेवारी) पावेतो पोलीस कोठडी मंजुर केलेली असल्याने सदर पोलीस कोठडी दरम्यान त्यांचेकडे तपास करुन गुन्ह्यातील इतर आरोपी व उर्वरीत माल याचा शोध घेण्याच्या अनुषंगाने तपास चालू आहे.

(दि.23 डिसेंबर) रोजी 17.38 वा.सु. ज्योती क्रांती कोऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी शाखा धाराशिव मध्ये पाच अनोळखी इसमांनी येऊन रिव्होलवर व चाकुचा धाक दाखवून ज्योती क्रांती कोऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी मधील 4 किलो 126 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 1,40,000₹, दोन मोबाईल असा एकुण  1, 87, 14, 000 ₹ किंमतीचा माल जबरीने लुटून पसार झाले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- फिर्यादी नामे- सतीश अनिरुध्द फुटाणे, (वय 37 वर्षे), व्यवसाय- कॅशीअर ज्योती क्रांती को.ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी शाखा धाराशिव, रा.पळसप, ता.जि. धाराशिव दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे गुरनं 426/2023 कलम 395 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला होता.

तपासादरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली व आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांचे 9 पथके स्थापन करुन आरोपीतांचा व गेलेल्या मालाचा शोध घेणे कामी रवाना केले होते. तसेच घटनास्थळावरील व इतर ठिकाणचे सिसिटीव्हि फुटेज व सिडीआर चे तांत्रिक विश्लेषणात्मक परिक्षण करुन आरोपी नामे- 1) रमेश बळीराम दिक्षीत, रा.विजय चौक धाराशिव ता.जि. धाराशिव, 2) उदयन वेलाउदयन वल्लीकालाईल, रा. नेरुळ नवी मुंबई, 3) प्रशांत जालीदंर शिंदे, रा.नेरुळ नवी मुंबई यांनी त्यांचे अन्य इतर साथीदारासह सदरचा गुन्हा केलेला असल्याचे सांगितले, सदर आरोपींना नमुद गुन्ह्याच्या तपास कामी अटक करण्यात आली असुन यातील वर आरोपी क्र. 1) रमेश बळीराम दिक्षीत, रा. विजय चौक धाराशिव ता.जि. धाराशिव, याचे कडून गेलेल्या मालापैकी 1007 ग्रॅम (1 किलो 7 ग्रॅम) सोन्याचे दागिने ज्याची किंमत 50,35,300 ₹. चा माल जप्त करण्यात आलेला आहे. गुन्ह्यातील अटक आरोपींताना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची (दि.08 जानेवारी) पावेतो पोलीस कोठडी मंजुर केलेली असल्याने सदर पोलीस कोठडी दरम्यान त्यांचेकडे तपास करुन गुन्ह्यातील इतर आरोपी व उर्वरीत माल याचा शोध घेण्याच्या अनुषगांने तपास चालू आहे.

अशा प्रकारे सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, स्थागुशा चे सपोनि सुदर्शन कासार, शैलेश पवार, पोलीस उप निरीक्षक संदीप ओहोळ, पोहेकॉ- अश्विन जाधव, दिलीप जगदाळे, अमोल निंबाळकर, प्रकाश औताडे, जावेद काझी, वल्ली उल्ला काझी, हुसेन सय्यद, शौकत पठाण, पाडुरंग सावंत, विनोद जानराव, समाधान वाघमारे, अशोक ढगारे, नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक घुगे, चौरे, भोसले, गुरव, आरब, मपोहेकॉ शैला टेळे, शोभा बांगर, रंजना होळकर, तसेच सायबर सेलचे पोलीस अंमलदार- अशोक कदम, सुनिल मोरे यांच्या पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.