Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर कोथरूड परिसरातील गोळीबार,

8

पुणे,दि.०५:- कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरूड परिसरात शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला आहे. कोथरूड परिसरातील सुतारदरा या ठिकाणी शरद मोहोळ जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी शरद मोहोळ यांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळ त्याच्या खांद्याला लागली.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ याच्यावर सह्याद्री रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला आहे. गोळ्या झाल्यानंतर आरोपी पसार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांचे पथक घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.