Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गोडाऊनमधुन सुपारीची चोरी करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

8

गोडाऊन मधुन सुपारीची चोरी करणारी टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई…

नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ३०/१२/२०२३ चे १९/०० वा. दरम्यान फिर्यादी नामे – शैलेश परसराम कावळे, वय
३३ वर्ष, रा. मनसर चिचखेडे ले आउट वार्ड क्र. ०१ ता. रामटेक हे आपल्या पान मटेरियलचे गोडावुन उघडण्याकरीता गेले असता, गोडावुनचे समोरील लोखंडी शटर उजव्या बाजुने वाकवुन दिसले तेव्हा फिर्यादीने गोडावुनचे आतमध्ये जावुन बघितले असता गोडावुन मधील १४ सुपारीचे बोरी व ०१ खाण्याचे चुन्याची पेटी असा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरून नेल्याचे फिर्यादीचे रिपोर्ट वरून पोलिस स्टेशन रामटेक येथे अप. ९७३ / २३ कलम ४६१, ३८० भादंवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाचा समांतर तपासात दि. ०३/०१/२०२३ रोजी पो.स्टे रामटेक अप. ९७३ / २३ कलम ४६१, ३८० भादंवी गुन्हयाचे समांतर तपासात स्थानिक  गुन्हे शाखा शोध मोहीम करत  असतांना गोपनीय माहीत कडून व cctv फुटेज वरून आरोपी नामे- १) दिलीप इंद्रसेन कैथवार, वय वर्ष २) नाईटी उर्फ तुषार तुलसीराम वानखेडे, वय २८ वर्ष ३) गजनी उर्फ राम सुरेश खंडारे, वय ३० वर्ष, सर्व रा. कन्हान ता. पारशिवनी यांना ताब्यात घेऊन चोरीस गेलेला मुद्देमाल १) ८ पोते सुपारी एकूण २०० किलो प्रती ५००६ रु प्रमाणे एकूण कि १,००,०००/- रु २) महिन्द्रा बोलेरो पिकअप क्र. MH-40-CM-8533 किंमती ७,००,००० /- रु. असा एकुण ८,००,००० /- रु. चा माल जप्त करून सदर तीन आरोपी यास मुद्देमालासह पुढील तपासकामी पो.स्टे. रामटेक यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही ही  पोलिस अधीक्षक  हर्ष पोद्दार,अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलिस निरीक्षक राजीव कर्मलवार, पोलिस उपनिरीक्षक बडूलाल पांडे, सहायक फौजदार नाना राऊत, पोलिस हवालदार विनोद काळे, रोशन काळे, प्रमोद भोयर, शंकर मडावी, नितेश पिपरोदे, पोलिस नायक वीरू नरड, संजय
बरोदीया, विपीन गायधने चालक अमोल कुथे, मोनू शुक्ला, सतिश राठोड सायबर सेल यांनी पार पाडली.

Leave A Reply

Your email address will not be published.