Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
किस्त भरण्यास पैसे नसल्याने फायनान्स वाले सारखे त्रास द्यायचे म्हनुन स्वतहाच रचला ट्रॅक्टर चोरीचा बनाव…
अमरावती(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दि. ०३/०१/ २०२३ रोजी फिर्यादी नामे विनायक बळीराम खंडारे, वय ६२ वर्ष, रा अजनी ता. नांदगाव खंडेश्वर यांनी पोलिस स्टेशन लोणी येथे तोंडी तक्रार दिली की, त्यांचा महिद्रा ५७५ कंपनीचा लाल रंगाचा टॅक्टर कमांक एम.एच २७ डी.ई ५८६६ हा दिनांक ३१/१२/२०२३ चे रात्री दरम्यान कोणीतरी अज्ञात चोराने घराचे अंगनातून चोरून नेला आहे वरून पोलिस स्टेशन लोणी येथे अप क्रमांक ०२ / २४ कलम ३७९
भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधिक्षक, विशाल आनंद यांनी सदर गुन्हा उघडकीस आणनेकरीता स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस स्टेशन लोणी यांना आदेशीत केले होते.
आज दिनांक ०५/०१/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथील पथक सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहीती मिळाली की, सदरचा चोरी गेलेला टॅक्टर हा ग्राम धनज परीसरामध्ये ठेवलेला आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून पथक ग्राम धनज परीसरामध्ये जावून चोरी गेलेल्या टॅक्टरचा शोध घेतला असता सदरचा टॅक्टर हा प्रल्हादराव उमाळे यांचे जामठी खुर्द शेत शिवारातील शेतात मिळून
आल्याने त्यांना व त्यानूसार फिर्यादी व त्यांचे मुलाला विचारपूस केली असता त्यांचे कथनामध्ये तफावत दिसून आल्याने टॅक्टर चोरी बाबत संशय निर्मान झाला. फिर्यादी व त्यांचे मुलाला या अनुषंगाने कसून विचारपूस केली असता फिर्यादी जवळ टॅक्टरची किस्त भरायला पैसे नसल्याने फायनंन्स वाले नेहमी पैसे वसुली करीता त्यांचे घरी येत होते व टॅक्टर उचलुन नेण्याबाबत धमकी देत होते. चोरीचा बनाव केल्याने किस्त भरण्याची गरज उरनार नाही असे
गृहीत धरून त्यांनी सदरचा टॅक्टर त्यांचे नातेवाईक प्रल्हादराव उमाळे रा. धनज यांचे शेतात लपवून ठेवून चोरी गेल्याचा खोटा बनाव केला होता. अशी गुन्हयाबाबत कबुली दिली त्यांचे कडून गुन्हयातील टॅक्टर महिद्रा ५७५ सरपंच कंपनीचा टॅक्टर लाल रंगाचा क्रमांक एम.एच २७ डी.ई ५८६६ किंमत अंदाजे ६,००,०००/- रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपी
१) यशपाल विनायक खंडारे, वय ३० वर्ष,
२) विनायक बळीरामजी खंडारे, वय ६० वर्ष दोन्ही रा. अजनी ता. नांदगाव खंडेश्वर
व जप्त मुददेमाल पुढील कारवाही करीता पोलिस स्टेशन लोणी यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांचे
नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण येथील पोउपनि संजय शिंदे, अंमलदार त्रंबक मनोहर, सुनिल महात्मे, सैययद
अजमत, सुधिर बावने, निलेश डांगोरे, चालक निलेश येते यांनी केली.