Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

४ लाखाचे मुद्देमालासह वाहनचोरटे अमरावती शहर पोलिसांचे तावडीत सापडले…

6

वाहन चोरी करणाऱ्यांना नागपुरी गेट अमरावती शहर  पोलिसांनी केली अटक;४ लाखांचा मुद्देमाल जप्त…

अमरावती (प्रतिनिधी)- पोलिस स्टेशन नागपुरी गेट, अमरावती शहर येथे फिर्यादी यांनी तक्रार दिली होती की, नागपुरी गेट हद्दीतुन त्यांची मोटार सायकल हिरो स्प्लेन्डर क्रमांक एम.एच-२७-वाय-२९५ कि.अं. ५०,०००/- रू ची कोणी तरी अज्ञात आरोपीने चोरून नेली आहे अशा फिर्यादीची तक्रार दिल्यावरून अज्ञात आरोपी विरूध्द पोलिस स्टेशन, नागपुरी गेट अमरावती शहर येथे अपराध क्र.०३/२०२४ कलम ३७९ भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंद असुन तपासावर आहे.

पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने पोलिस आयुक्तालय हद्दीत मोटार सायकल च्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच सदर मोटार सायकलचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता गुन्हेशाखा युनिट क्रमांक २ कडील पथकाने पाळत ठेवुन पेट्रोलींग करीत असताना (दि.०५जानेवारी) रोजी गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, दोन इसम हे चोरीची मोटार सायकल हिरो स्प्लेन्डर क्र. एम.एच-२७-वाय-२९५ गाडी ही लालाडी परीसरात घेवुन फिरत आहेत अशा माहीती वरून सदर इसमांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव

१) कलीम खों उर्फ कल्लु वल्द हबिब खों (वय ३२ वर्ष) रा.लालखडी, कदीर वायरमेन यांचे घरा जवळ अमरावती,

२) शेख आरीफ उर्फ कोब्रा वल्द शेख मजीद (वय २७ वर्ष) रा.लालखडी, कलंदर हॉल समोर, अमरावती

असे सांगितले. त्यांचे ताब्यातील मोटार सायकल हिरो स्प्लेन्डर क्रमांक. एम.एच-२७-वाय-२९५ वाहनाचे कागदपत्रांबाबत विचारपुस केली असता त्याने उडवा-उडविचे उत्तरे दिल्या वरून सदर मोटार सायकल ही पो.स्टे. नागपुरी गेट हद्दीतुन चोरी झाल्याबाबत निष्पन्न झाल्या वरून सदर इसमांना विश्वासात घेवुन त्यांची विचारपुस केली असता. त्यांनी सांगितले की, सदर मोटार सायकल आणि इतर ८ मोटार सायकली सुध्दा आम्ही चोरी केल्या आहेत. त्या वरून सदर आरोपीतांना पोलिस स्टेशन, नागपुरी गेट अमरावती शहर येथे अपराध क्रमांक ०३/२०२४ कलम ३७९, ३४ भा. द. वि. गुन्हयात अटक करून त्यांच्या ताब्यातुन चोरीच्या एकूण ९ मोटार सायकली जप्त केल्या आहेत.

पोलिस आयुक्तलय अमरावती शहर व अमरावती ग्रामीण व इतर जिल्हयातील असे एकुण ९ मोटार सायकली कि.अं. ४,३५,०००/- रू चा मुद्देमाल आरोपी नामे १) कलीम खॉ उर्फ कल्लु वल्द हबिब खॉ (वय ३२ वर्ष) रा.लालखडी, कदीर वायरमॅन यांचे घरा जवळ अमरावती, २) शेख आरीफ उर्फ कोब्रा वल्द शेख मजीद (वय २७ वर्ष) रा.लालखडी, कलंदर हॉल समोर, अमरावती यांचे ताब्यातुन जप्त करून गुन्हे उघड केले.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त परीमंडळ-१ सागर पाटील, सहायक पोलिस आयुक्त गुन्हे शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक. राहुल आठवले, गुन्हे शाखा युनिट क.२ अमरावती शहर, यांचे नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगोले, पोउपनि राजकिरण येवले, पोलिस अंमलदार राजेंद्र काळे, जावेद अहेमद, दिपक सुंदरकर, गजानन देवले, एजाज शहा, चेतन कराडे, राजीक रायलीवाले, योगेश पवार, निलेश वंजारी, संदिप खंडारे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.