Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चोरलेले दागीने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

9


चोरलेले दागीने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…




चोरलेले दागिने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…

लातुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलिस अधिकारी/अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकामार्फत जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते. तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती.
दरम्यान 08/01/2024 रोजी10:30 पोलिस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चोरलेले सोन्याचे दागिने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला औसा रोड परिसरातून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांने त्यांचे नाव
1) भरत इंद्रजीत कदम, वय 27 वर्ष, राहणार पवार नगर,औसा

असे असल्याचे सांगितले. नमूद आरोपीला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने सांगितले की, दिनांक 07/01/2024 रोजी पवार नगर, औसा येथील घरातून चोरी केली आहे.त्यावरून औसा पोलिस ठाण्याच्या अभिलेखाची माहिती घेतली असता पोलिस ठाणे औसा येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 05/2024 कलम 380 भादवी प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले.
नमूद आरोपीने वर गुन्ह्यात चोरलेली सोन्याची 15 ग्रॅम वजनाची एक पाटली 90,000/-रु चा  मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, यांच्या नेतृत्वात  पोलीस अंमलदार मनोज खोसे, साहेबराव हाके, नितीन कठारे, चालक चंद्रकांत केंद्रे यांनी केली आहे.





Leave A Reply

Your email address will not be published.