Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नांदेड स्थागुशा पथकाने अवैधरित्या गांजाविक्री करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या…

10

नांदेड शहरात गांजाची विक्री करणारे स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद, .1,08,000/-  रु चा गांज्या जप्त…

नांदेड(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड शहरात व जिल्हयात चोरी छुप्या मार्गाने होत असलेल्या अंमली पदार्थ गांजाचे आवक व विक्रीची गोपनिय माहिती हस्तगत करुन, त्याचे विरुध्द कायदेशिर कार्यवाही करणे बाबत पोलिस अधीक्षक, नांदेड यांनी पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना आदेशित केले होते. त्यावरुन उदय खंडेराय, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी वेगवेगळे पथके नेमुन त्यांना नांदेड शहरातील व जिल्हयातील आंमली पदार्थ गांजाचे आवक व विक्रीची गोपनिय माहिती काढुन कार्यवाही करणे बाबत आदेशित केले होते. त्याअनुषंगाने दिनांक 08.01.2024 रोजी पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय  काळे यांना गोपनिय माहिती मिळाली की, नांदेड शहरात आंमली पदार्थ गांजाची विक्री करण्यासाठी गांजा घेवुन काही इसम नांदेड शहरात येणार आहेत. या मिळालेल्या माहिती प्रमाणे त्यांनी वरिष्ठांना माहिती देवुन, राजपत्रित अधिकारी यांना बोलावुन घेवुन, अधिकारी, पंच व स्टाफसह पोलिस ठाणे शिवाजीनगर हद्दीत छापा मारुन, आरोपी नामे

1) शेख अनिस शेख सलीम रा. नई आबादी, शिवाजीनगर, नादेड

2)शेख इम्रान शेख अहेमद रा. तेहरानगर, नांदेड 3. भुजंग निवृत्ती जोंधळे रा. आंबेडकरनगर, नांदेड

या आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन एकुण रु.1,08,000/- चा अंमली पदार्थ गांजा जप्त केला आहे. यातील आरोपीतांना सदरचा गांजा हा आरोपी हामीद खान गौस खान रा. नई आबादी, शिवाजीनगर, नांदेड याने विक्री करण्यासाठी दिल्याचे सांगीतले
आहे. तो गुन्हयात फरार आहे. सदर प्रकरणी पोलिस ठाणे शिवाजीनगर, नांदेड येथे एन. डी. पी. एस. अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी  श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक, अबिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक, नांदेड डॅा. खंडेराव धरणे, अपर पोलिस अधीक्षक, भोकर, यांचे मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, नायब तहसिलदार श्री. के. बी. डांगे, तहसिल कार्यालय, नांदेड, पोलिस उप निरीक्षक, दत्तात्रय काळे, आनंद बिचेवार, पोलिस अंमलदार बालाजी तेलंग, किशन मुळे, गजानन बयनवाड, विलास कदम, रणधीर राजबंशी, धम्मानंद जाधव, राजु पुलेवार, महिला पोलिस अंमलदार किरण बाबर व चालक श्रीरामे, कलीम शेख यांनी पार पाडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.