Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शेतकऱ्यांचा धाडसी प्रयोग! चक्क हवेवर पिकवला गहू; वाचा याची वैशिष्ट्ये आणि संपूर्ण प्रक्रिया

9

सांगली: केवळ हवेवर गव्हाचे पीक घेता येते. या गोष्टीवर कोणाचाही सहज विश्वास बसणार नाही. मात्र, ही किमया केली आहे सांगली जिल्ह्यातील कायम दुष्काळी असणाऱ्या खानापूर घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांनी. पावसाच्या पाण्यावर अवलंबून न राहता केवळ एका पावसाच्या पाण्यावर कुठल्याही खत आणि औषधांशिवाय चक्क हवेवर गहु पिकाचे उत्पादन घेतले जात आहे. घाटमाथ्यावरचे हवामान आणि जमीन ओलसरपणाच्या आधारे हा गहू पिकवला जातो. या भागात या बिनपाण्याच्या गव्हाला शेत गहू किंवा हवेवरचा गहू म्हणतात.
… तर चाळीस गद्दार अपात्र होतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ देत आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले…
सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी पट्टा असलेल्या खानापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी अनोखा प्रयोग केला आहे. केवळ पावसाच्या पाण्यावर कुठल्याही खत आणि औषधांशिवाय हवेवर गहू पिकतो. या गव्हाला शेत गहू किंवा हवेवरचा गहू म्हणतात. घाटमाथ्यावर काही मोजक्या क्षेत्रातच तेथील हवामान आणि जमिनीच्या ओलसरपणाच्या जीवावर या गहूचे पीक घेतले जाते. या गव्हाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हा केवळ जमिनीत असणाऱ्या ओलीवर येतो. पुन्हा पाणी द्यावं लागत नसल्याने एकदा पेरल्यानंतर काढायलाच जायचे, असा काहीसा प्रकार याबाबतीत होतो.

विशेष म्हणजे दुष्काळी, कमी पावसाच्या इतर कुठल्याही पट्ट्यापेक्षा खानापूर घाटमाथ्यावर या गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. हे पीक घेण्यासाठी मध्यम जमीन लागते. वातावरण कोरडे असले तरी गारवा आवश्यक असतो. या दोन्ही गोष्टी रेणावी, रेवणगाव, घोटीखुर्द, घोटी बुदुक घोडेवाडी, ऐनवाडी, पोसेवाडी, जाधववाडी, तामखडी अडसरवाडी या घाटमाथावरील गावच्या शेतामध्ये मिळतात. खानापूर घाट माथ्यावर ८ ते १० गावांत मिळून किमान १२५ ते १५० एकरात या शेत गहू पिकाचे उत्पन्न घेतले जातो. त्याला ‘हवेवरचा गहू’ असंही म्हणतात. इतर सर्व गव्हांच्या वाणापेक्षा हा वेगळा असतो. या शेतगव्हाचा बाजार भाव सुद्धा इतर गव्हाच्या तुलनेत जास्तीचा असतो.

आजारी नार्वेकर अचानक वर्षावर, यांच्याकडून आम्ही कोणत्या निकालाची अपेक्षा करावी? उद्धव ठाकरेंचा सवाल

शेत गव्हाची वैशिष्ट्य:
या गव्हाच्या चपात्या किंवा पोळ्यांचा रंग लालसर असतो. त्या अत्यंत मऊ, स्वादिष्ट आणि पचायला हलक्या तसेच आरोग्यास चांगल्या असतात. याचे बियाणे स्वतंत्रपणे या भागातील शेतकऱ्यांकडे संरक्षित केलेले आहे.

शेत गव्हाची पेरणी होते कधी?
साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या शेवटाला म्हणजे दसरा झाल्यानंतर या गव्हाची पेरणी केली जाते. त्यानंतर साडेचार ते पाच महिन्यात हे पीक येते. थंडीच्या दिवसातील वातावरण या पिकाला पोषक असते. रब्बी हंगामात जमिनीतल्या ओलीवर येणारा हा गहू आहे. त्यासाठी एकदाही पाणी द्यावे लागत नाही. एकरी २० किलो गव्हाचे बियाणे लागते. त्यात एरवी ५ ते ६ क्विंटल (कधी कधी ६ ते ७ पोतीसुद्धा) उत्पन्न निघते. हे वाण दुर्मिळ असल्यामुळे सध्या परंपरागत काही लोकांच्याकडेच उपलब्ध आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.