Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत दारु व जुगार खेळणारे SP चे विशेष पथकाचे ताब्यात…

11


दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत दारु व जुगार खेळणारे SP चे विशेष पथकाचे ताब्यात…




पोलिस अधिक्षक,छत्रपती संभाजी नगर यांचे विशेष पथकांकडुन अवैध दारु विक्री करणारे हॉटेल चालक व जुगार अडयावर धाड… 7,40,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त….

छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया  यांनी जिल्हयातील अवैध धंदे बेकायदेशीरपणे चोरटया रित्या जिल्हयात धाबे व हॉटेल वर देशी /विदेशी दारु विक्री, जुगार यांचे विरुध्द सक्त कारवाईचा बडगा उगारत असे धंदे चालविणारे चालकाविरुध्द छापे मारून विरुध्द गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

याअनुषंगाने पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शनानुसार विशेष पथक हे अवैध धंद्यावरती कारवाई करण्याचे बेताने जिल्हयात गस्त घालत असतांना विशेष पथक प्रमुख यांना गोपनीय माहिती मिळाली कि, वेरूळ जवळील शार्दुलवाडी परिसरात काही ईसम हे शेतात पत्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असल्याची माहिती मिळाली होती. यावरून पथकांने दिनांक 09/01/2024 रोजी रात्री 12.15 वा चे सुमारास छुप्या पध्दतीने शार्दुलवाडी येथील अमजत बिसमिल्ला खान यांचे शेतात पाहणी व पडताडनी केली असता तेथे काही अतंरावर दुचाकी, अॅटो रिक्षा अशी वाहने पार्किंग  केलेली दिसुन आली. तसेच शेतातील बंद खोलीच्या बाजुला असलेल्या लिंबाच्या झाडाखाली छोटया लाईट बल्ब च्या उजेडात काही इसम हे पैशावर52 पत्याचे सहय्याने जुगार खेळतांना दिसुन आले यावरुन पथकांनी अचानक घेराव टाकुन छापा टाकला असता पोलिसांचे अचानक कारवाईने जुगारी इसमांची धांदल उडाली व यातील काही ईसम हे मिळेल त्या रस्त्याने अंधाराचा फायद्या घेवुन सैरावैर पळत सुटले परंतु तरीही पथकातील पोलिसांचे पथकांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. या संपूर्ण कारवाईत खालील नमुद ०८ जुगारी ईसमांना ताब्यात घेण्यात आले आहे. १) शेख करीम शेख गणी वय ३८ वर्षे स. वेरुळ ता. खुलताबाद २) आसिफ ताहेर खान वय ४७ वर्षे रा. खुलताबाद ३) हमीद अलीमुद्दीन शेख वय ४० वर्षे रा. कसाबखेडा ता. खुलताबाद ५) शेख जाकेर शेख वजीर वय ३८ वर्षे स. सोनखेडा ता. खुलताबाद ६) आकाश शंकर शिंदे वय २५ वर्षे रा. कसाबखेडा ता. खुलताबाद ७) सईद अब्दुल सत्तार वय २९ वर्षे रा. वेरुळ ८) हमीद इब्राहिम शेख वय ५३ वर्षे रा. खुलताबाद असे मिळून आले आहेत. नमुद कारवाई मध्ये रोख 25830/- रुपयांसह दुचाकी वाहने, तीन चाकी अॅटो रिक्षा, मोबाईल फोन, पत्ताचे केंट, इतर जुगाराचे साहित्य असे एकुण 701830/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपीविरुध्द पोलिस ठाणे खुलताबाद येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस ठाणे खुलताबाद हे करित आहेत.

याचप्रमाणे विशेष पथकाला माहिती मिळाली कि, पोलिस ठाणे शिवुर हचीतील मनूर येथील हॉटेल पवन मराठा येथे मोठ्या प्रमाणावर चोरटया मार्गाने अवैधरित्या ग्राहकांना देशी विदेशी दारुची सरास विक्री होत आहे. या माहितीच्या आधारे पथकाने मनूर येथे दिनांक 09/01/2024 रोजी सकाळी 06:30 वा चे सुमारास मिळालेल्या माहितीच्या हॉटेल पवन मराठा परिसरात सापळा लावला. यावेळी नमुद हॉटेल मध्ये संशयीत हालचाल दिसुन आल्यानंतर पथकाने अचानक छापा मारला असता हॉटेल चालक विठ्ठल बारकू दवंगे यांने हॉटेल परिसरात देशी व विदेशी दारूच्या 180 मिली व 90 मिली च्या सुमारे 665 बॉटल ज्यांची किंमत 37,800/- रूपयांचा लपवून ठेवलेला मिळून आला आहे. अवैध विक्री करण्यासाठी लपवून ठेवलेल्या सर्व  बॉटल जप्त करण्यात आले असुन हॉटेल चालक विठ्ठल बारकू दवंगे वय ५५ वर्षे रा. मनूर ता. वैजापुर याचे विरुध्द पोलिस ठाणे शिवुर येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस ठाणे शिवुर करित आहे.

सदरच्या दोन्ही कार्यवाही ह्या मनिष कलवानिया, पोलिस अधीक्षक यांचे विशेष पथकाने  केली आहे.





Leave A Reply

Your email address will not be published.