Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पोलिस स्टेशन ,परतवाडा हद्दीतील कुख्यात गुंड एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध…
परतवाडा(अमरावती ग्रामीण)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,
पोलिस स्टेशन परतवाडा हद्दीतील ग्राम अंबाडा येथील कुख्यात गुंड अजय ऊर्फ लखन धनराज वानखडे हा पोलिसांचे कारवाईला न जुमानता स्वतः तसेच साथीदारांसह चोरी व शरिराविरुद्धचे दखलपात्र स्वरुपाचे गुन्हे जसे की, बलादग्रहण करण्याकरीता एखाद्या व्यक्तीला क्षती पोहचविण्याची भिती घालणे, दरोडा घालण्यासाठी एकत्र जमणे व दरोडयाची पूर्वतयारी करणे, सुज्ञ नागरिकांना मारहाण करणे, नागरिकांनी प्रतिकार केल्यास त्यांना
जिवे मारण्याची धमकी देणे, सशस्त्र दहशत पसरविणे, गैरकायद्याची मंडळी जमवुन दंगा करणे, फौजदारीपात्र गृह
अतिक्रमण करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, इतर धर्मीयांच्या उपासनास्थानाचे नुकसान करण्याचा प्रयत्न करणे, नागरिकांना गैरनिरोध करणे यासारखे गुन्हे करण्यामध्ये गुंतलेला होता.
त्याने परतवाडा परिसरामध्ये गुंडप्रवृत्तीचा इसम म्हणुन ओळख निर्माण करुन नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. त्याचेमुळे सार्वजनिक व वैयक्तिक मालमत्तेस व जिवितास मोठया प्रमाणात बाधा निर्माण होवुन लोकांचे मनात असुरक्षिततेची व भितीची
भावना निर्माण झाली होती. नमुद इसमाविरुद्ध उघड उघड तक्रार देण्यास कोणीही धजावत नव्हते. त्याचेवर वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईचा त्याचे वर्तणुकीवर काहीएक परिणाम झाल्याचे दिसुन येत नव्हते. परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व कुख्यात धोकादायक इसमाचे गुन्हेगारी वृत्तीस आळा घालण्यासाठी पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रामीण यांनी त्यास एम.पी.डी.ए. कायद्यान्वये एक वर्षाकरीता स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी, अमरावती यांचेकडे सादर केला होता. मा. श्री. सौरभ कटियार, जिल्हादंडाधिकारी, अमरावती यांनी सर्व कायदेशिर बाबींची पडताळणी करुन तसेच नमुद इसम हा कुख्यात धोकादायक इसम असल्याची स्वतःचे स्त्रोतामार्फत खात्री करुन त्यास अमरावती
जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध ठेवण्याबाबतचा आदेश दिनांक ०८/०१/२०२४ रोजी पारित केला आहे. मा. जिल्हादंडाधिकारी, अमरावती यांचे आदेशास अनुसरुन कुख्यात धोकादायक इसम अजय ऊर्फ लखन धनराज वानखडे, रा. ग्राम अंबाडा, वार्ड क्र. ०३, ता. अचलपुर, जि अमरावती यास सदरचा आदेश तामील करून त्यास दिनांक ०८/०१/२०२४ रोजी जिल्हा मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक विशाल आनंद (भा.पो.से.), अपर पोलिस अधिक्षक विक्रम साळी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांचे नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक सागर हटवार, पोहवा अमोल देशमुख तसेच पोलिस स्टेशन परतवाडा येथील ठाणेदार सपोनि संदिप चव्हाण यांनी पार पाडली. अमरावती ग्रामीण जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहुन शांतता राहावी याकरीता अशा प्रकारचे
गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या गुंड / सराईत गुन्हेगारांची माहिती संकलीत करण्यात येत असुन त्यांचेवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे.